Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीवृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी रणधुमाळी सुरू

श्रीवृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी रणधुमाळी सुरू

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) –

पाथर्डी तालुक्याची कामधेनू असलेल्या श्रीवृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक रणधुमाळीस (दि 7) गुरुवारपासून

- Advertisement -

सुरुवात झाली आहे.28 इच्छुकांनी 52 उमेदवारी अर्ज नेले आहेत.अद्याप एकानेही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.

तालुक्याची कामधेनू म्हणून वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे पाहिले जाते. करोना संसर्गामुळे सुरू असलेल्या टप्प्यावर निवडणूक स्थगित करण्यात आली होती. मात्र सध्या करोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून पाथर्डी-शेवगावचे प्रांताधिकारी देवदत्त केकाण हे काम पाहणार आहेत.

वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 19 जागांसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी दि.7 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे.7 आणि 8 उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे दोन दिवस निरंक राहिला आहेत. 28 जणांनी 52 उमेदवारी अर्ज घेतले आहेत.दि .7 ते 13 जानेवारी दरम्यान अर्ज भरण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

उमेदवारी अर्ज व मतदार याद्या घेऊन जाणार्‍या उमेदवारांमध्ये गोरक्ष कारभारी फुंदे (1), अमोल अच्युतराव वाघ (4), गहिनीनाथ पाटीलबा ढाकणे (1), अंबादास धोंडीबा बळीद (1), परसराम नामदेव लोंढे (2), भाऊसाहेब मळू उघडे (2), रत्नप्रभा शेषराव कचरे (2), शेषराव सूर्यभान कचरे (2), वैभव पोपटराव आंधळे (2), मंगलताई अर्जुन राजळे (2), शिवशंकर अर्जुन राजळे (4), अर्जुन दादाबा राजळे (4), बापुसाहेब गोविंद घोरपडे (1) ,सुरेश पंढरीनाथ बाबर ( 1),बाबासाहेब साहेबराव खेडकर ( 02),शंकर नामदेव भिसे ( 02),बाजीराव आश्राजी गर्जे (01),कालीदास उमाजी गर्जे (02),देवराव रामभाऊ भोईटे (01),तात्यासाहेब पुंजाजी भगत (01),संदीप म्हतारदेव राजळे ( 02),बाळासाहेब कारभारी कचरे (02),विनायक सूर्यकांत कचरे (02)वत्सलाबाई कारभारी कचरे ( 02),धोंडीराम माधवराव गर्जे ( 02),विष्णू कस्तुरबा भोरडे ( 1),लक्ष्मीबाई विष्णुदास भोरडे (1),आनंदा विठोबा पवार (02) यांचा समावेश असून निवडणूक लढवण्यासाठी अर्जाची खरेदी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या