Sunday, May 5, 2024
Homeनगरश्री वृद्धेश्वर जिल्ह्यात दुसर्‍या क्रमांकावर

श्री वृद्धेश्वर जिल्ह्यात दुसर्‍या क्रमांकावर

करंजी |प्रतिनिधी| Karanji

क्षमतेच्या तुलनेत जास्तीचे दैनंदिन गाळप, साखर उतारा व साखर उत्पादन अशा गुणवत्तेच्या तिहेरी स्तरांवर जिल्ह्यात या वर्षीच्या गळीत हंगामात पाथर्डी तालुक्यातील वृध्देश्वर साखर कारखाना दुसर्‍या क्रमांकावर आला आहे.

- Advertisement -

तेरा तालुक्यांतील तेरा सहकारी व तीन खाजगी साखर कारखान्यांनी 22 मार्च अखेर केलेल्या गळिताच्या सार्वत्रिक आकडेवारीवरून हे समोर आले आहे. कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता अडीच हजार मेट्रीक टनाची आहे. बहुतांश ठिकाणी स्वयंचलित यंत्रणा कार्यरततेमुळे मात्र वीस टक्के वृद्धी होऊन 3100 मेट्रिक टनापर्यंत प्रतीदिन गाळप होत आहे.आता पर्यंतच्या सर्व हंगामाचा हा उच्चांक आहे. कारखान्याने या हंगामात चार लाख क्विंटल कच्ची व निर्यातक्षम साखर उत्पादीत करून निर्यातही केली.

या निर्यात साखरेस उच्चांकी दरही मिळाला. सर्व बाबींचा समन्वयी विचार करून संचालक मंडळाने पुन्हा एक लाख क्विंटल कच्ची साखर तयार करून निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे अडीच हजार मेट्रिक टन प्रतीदिन गाळप क्षमता असलेल्या कारखान्यांपैकी या हंगामात सुमारे पाच लाख क्विंटल कच्ची साखर निर्यात करण्याचा बहुमानही राज्यात वृद्धेश्वरला प्राप्त झाला आहे. कारखान्याने 26 मार्च अखेर गाळपाचे 143 दिवसांत 4 लाख 11 हजार मेट्रीक टन उसाचे गाळप करून 4 लाख 34 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

प्रारंभी कारखान्याने बी हेवी मोलासेस उत्पादित केले असून आता सी हेवी मोलासेसला चांगले दर मिळू लागल्याने सी हेवी मोलासेसचे उत्पादनही सुरू केले आहे. इथेनॉलच्या रूपाने उपपदार्थ निर्मितीचे स्वप्नही आगामी गळीत हंगामात पूर्ण होईल.

– आमदार मोनीका राजळे

- Advertisment -

ताज्या बातम्या