Friday, April 26, 2024
Homeनगर'व्हीआरडीई’ स्थलांतराबाबत झाला 'हा' निर्णय

‘व्हीआरडीई’ स्थलांतराबाबत झाला ‘हा’ निर्णय

अहमदनगर (प्रतिनिधी)

‘व्हीआरडीई चे कुठल्याही प्रकारचे स्थलांतर होणार नसून तसे…

- Advertisement -

लेखी पत्रच डीआरडीओ यांच्याकडून मिळाली आहे,’ अशी माहिती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. नवी दिल्ली येथील डीआरडीओ भवन येथे विखे यांनी डीआरडीओचे चेअरमन रेड्डी, संजीव जोशी आणि डीआरडीओ च्या विविध विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांशी व्हीआरडीई संदर्भात बैठक घेतली.

या बैठकीमध्ये नगरमधील व्हीआरडीई लॅबच्या स्थलांतरासंदर्भात चर्चा झाली. त्याबाबत माहिती देताना खासदार विखे म्हणाले, ‘आज या प्रश्नी सविस्तर बैठक झाली आहे. व्हीआरडीई मध्ये कार्यरत असणारे कर्मचारी, अरणगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यासर्वांना सांगण्यास मला आता आनंद होत आहे की, व्हीआरडीईचे कोणत्याही प्रकारचे स्थलांतर होणार नाही. तसे मला लेखी पत्र मिळाले आहे. या लेखी पत्रात व्हीआरडीई मध्ये तुर्तास कुठलेही बदल होणार नसून त्याचे स्थलांतर होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

उलट व्हीआरडीई मध्ये नवीन प्रोजेक्ट सुरू होणार आहेत. व्हीआरडीईचे विस्तारीकरण होणार आहे, अशी मला माहिती देण्यात आले आहे. व्हीआरडीई विस्तारीकरणाबाबतचा निर्णय घेतला जात असल्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे आभार मानतो,’ असेही विखे यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या