Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी

ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात 14 तालुक्यांतील 188 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले.या निवडणुकीच्या मतदानानंतर सुमारे साडेतीन हजार उमेदवारांचे भवितव्य पेटीत बंद झाले असून आज मतमोजणीतून त्यांचा फैसला होणार आहे.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि.18) मतदान प्रक्रिया पूर्ण झाली.जिल्ह्यात एकुण 196 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यात 8 ग्रामपंचायतीत सरपंच व सदस्य आधीच बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे प्रत्यक्षात 188 ग्रामपंचायतींसाठी 745 मतदान केंद्रांवर मतदान झाले.

निवडणुकीत दोन हजार 897 उमेदवार सदस्य पदासाठी तर 577 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात होते. पिंपळगाव बसवंत, नांदूर शिंगोटे, दाभाडी, वडाळीभोई, उमराळे, डांगसौंदाणे यासह अनेक ग्रामपंचायतींमध्ये चुरशीच्या लढती असल्याने पोलीस यंत्रणेने अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली. संवेदनशील केंद्रावर जादा बंदोबस्त ठेवला होता.

बिनविरोध ठरलेल्या 8 ग्रामपंचायती

बागलाण : किकवारी बु,ढोलबारे,महड. नाशिक: कोटमगाव., चांदवड : नारायणगाव, कळवण: जयपूर, नांदगाव: शास्त्रीनगर, दिंडोरी: जालखेड

- Advertisment -

ताज्या बातम्या