Thursday, April 25, 2024
Homeनगरएकापेक्षा जास्त ठिकाणी मतदार नोंदणीला आळा बसणार

एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदार नोंदणीला आळा बसणार

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

एकापेक्षा जास्त मतदार संघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंद ओळखण्यासाठी आधार कार्ड नंबर संकलन केले जात आहे. 1 एप्रिल 2023 पर्यंत किंवा तत्पूर्वीच मतदार यादीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आधार क्रमांक उपलब्ध केला जाणार असल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार विनोद गिरी यांनी दिली.

- Advertisement -

यामुळे एकापेक्षा जास्त मतदारसंघात असलेल्या मतदार नोंदणीला आळा बसणार आहे. जिल्ह्यातील मतदारांनी आधार क्रमांकाच्या जोडणीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी केले आहे. मुळ गावात तसेच राहत असलेल्या शहरांमध्ये दोन्ही ठिकाणी अनेकांचे मतदार यादीत नाव आहेत. एकापेक्षा जास्त मतदार संघात एकाच व्यक्तीचे नाव असणे योग्य नसल्याने आधार कार्ड चा क्रमांक मतदार क्रमांकाशी संलग्न करून अशी नावे शोधून एक ठिकाणावरून वगळली जाणार आहे.

आयोगाने विकसित केलेल्या पोर्टल, अ‍ॅपच्या माध्यमातून मतदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून अर्ज क्रमांक 6 ब भरून आधार क्रमांक लिंक करू शकतात, शिवाय प्रशासनाकडून घरोघरी भेट देवून छापील अर्ज क्रमांक 6 ब द्वारे स्वइच्छेने आधार क्रमांक जमा करण्यात येईल.

– शशिकांत मंगरुळे, मतदार नोंदणी अधिकारी संगमनेर

एकापेक्षा जास्तवेळा त्याच मतदार संघात किंवा एकापेक्षा जास्त मतदारसंघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. दरम्यान आधार क्रमांक सादर करणे हे मतदारांसाठी ऐच्छीक आहे. मतदार यादीतील नोंदणीचे प्रमाणीकरण करणे हा या संकलनाचा उद्देश आहे.

– अमोल निकम, सहा. मतदार नोंदणी अधिकारी, संगमनेर

- Advertisment -

ताज्या बातम्या