Wednesday, April 24, 2024
Homeनगरमतदार याद्यांवर 18 ऑक्टोबरपूर्वी हरकती नोंदविण्याचे आवाहन

मतदार याद्यांवर 18 ऑक्टोबरपूर्वी हरकती नोंदविण्याचे आवाहन

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या आज दि. 13 ऑक्टोबर रोजी प्रसिध्द होणार आहेत. या प्रारूप मतदार याद्यांवर सर्वसामान्य नागरिकांनी 18 ऑक्टोंबरपूर्वी हरकती नोंदवाव्यात. असे आवाहन राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

- Advertisement -

ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणार्‍या साकुरी, रांजणखोल, खडकेवाके, सावळीविहीर बुद्रूक, लोहगाव, डोर्‍हाळे, आडगाव खुर्द, नपावाडी, निघोज, नांदुर्खी बुद्रुक, नांदुर्खी खुर्द व राजूरी या ग्रामपंचायती तसेच नव्याने ग्रामपंचायतीचे सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द होणार आहेत.

प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी दि. 21 ऑक्टोबर रोजी प्रसिध्द होणार आहे. सदर प्रारुप मतदार यादी तहसील, पंचायत समिती, तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये प्रसिध्द केली जाणार आहे. या याद्यांवरील हरकती तहसील कार्यालय राहाता येथे लेखी स्वरुपात दि. 18 ऑक्टोबर पूर्वी नोंदवाव्यात. असे आवाहनही श्री. हिरे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या