मतदारकार्ड आधार लिंक करण्याची मोहीम सुरू- प्रांताधिकारी पवार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 220 श्रीरामपूर (अ.जा) विधानसभा मतदार संघात निवडणूक ओळखपत्रास आधार क्रमांक लिंक करण्यासाठीच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. यासाठी नमुना 6 बी भरण्याबाबत निवडणूक आयोगाकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.

श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेला तालुक्यात सुरुवात करण्यात करण्यात आली आहे. मतदार कार्ड आधारशी जोडणे ऐच्छिक असले तरी शासनातर्फे घरोघरी जाऊन यावर जनजागृती केली जात आहे. त्यामुळे एकाच मतदाराचे अनेक ठिकाणी नाव असल्यास ते शोधणे सोपे होणार आहे. यामुळे एकाच मतदारामार्फत वेगवगेळ्या ठिकाणी असलेल्या नावनोंदणीला यामुळे टाच बसणार

मतदारकार्ड आधाराशी लिक करण्यासाठी 6 ब क्रमांकाचा अर्ज भरावा लागणार आहे, हा अर्ज ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी भरता येणार आहे. आधारसह मनरेगा जॉबकार्ड, पॅनकार्डसह इतर माहितीही या अर्जावर भरायची आहे. श्रीरामपुर मतदारसंघात एकूण 02 लाख 97 हजार मतदार आहेत. मतदारांना निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. तसेच ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी स्थानिक पातळीवर मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडून अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे, असेही श्री. पवार यांनी सांगितले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *