Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकव्यवसायाभिमुख शिक्षण महत्त्वाचे: बहाळे

व्यवसायाभिमुख शिक्षण महत्त्वाचे: बहाळे

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

आज व्यवसायाभिमुख शिक्षण (Vocational Education) महत्त्वाचे असून शिक्षण (education) व शेतीच्या पिकांमध्ये विविधता ठेवून मार्गक्रमण महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ललित बहाळे (Maharashtra State President of Farmers Association Lalit Bahale) यांनी केले.

- Advertisement -

कर्मवीर काकासाहेब वाघ (Karmaveer Kakasaheb Wagh) व सहकारमहर्षी माधवराव बोरस्ते (Sahakar Maharshi Madhavrao Boraste) यांच्या संयुक्त पुण्यतिथी निमित्ताने आयोजित शेतकरी मेळाव्यात ओझर कृषी उत्पन्न बाजार समिती (Ozar Agricultural Produce Market Committee) येथे बोलत होते.

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शेतकरी नेते रामचंद्र पाटील होते. आ. दिलीप बनकर (MLA Dilip Bankar), कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे (Shriram Shete, President of Kadva Cooperative Sugar Factory), मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार (Neelima Pawar, General Secretary of MVP), डॉ. तुषार शेवाळे, ज्येष्ठ नेते सुरेश बाबा पाटील, नानासाहीेब बोरस्ते, अनिल कदम, दिलीप मोरे, राजेंद्र मोगल, डॉ. सुनील ढिकले आदीे उपस्थित होते.

पवार यांनी काकासाहेब हे शैक्षणिक क्रांतीचे शिलेदार होते. गुजरात इतकाच भाव आपल्या भाताला मिळावा, यासाठी मोठे आंदोलन उभारून यशस्वी केले. काकासाहेब व सहकारमहर्षी माधवराव बोरस्ते यांनी नेहमी बेरजेचे राजकारण केले. काकासाहेब आयुष्यभर मविप्र संस्थेचे कार्यकर्ते राहिले. त्यांनी निसाका (NISAKA), एनडीसीसी (NDCC), साखर संघ इ ठिकाणी यशस्वी नेतृत्व केले.

शेटे यांनी अलीकडच्या काळात शेती व्यवसाय (Agricultural business) अडचणीत सापडला असून अर्थव्यवस्थेचा कणा मोडतो की काय, अशी भीती असून काकासाहेब व सहकारमहर्षी माधवराव बोरस्ते यांनी शेतकर्‍यांच्या भल्यासाठी आयुष्यभर काम केले. संस्था उभारल्या. त्यांचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा, असे सांगितले. आ. बनकर म्हणाले, आजच्या घडीला सहकार वाचविण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे, असे सांगून जिल्ह्यातील कारखाने सुरु करणे हीच काका व तात्यांना श्रद्धांजली ठरेल. प्रास्ताविक माणिकराव बोरस्ते यांनी केले.

यावेळी कर्मवीर माधवराव बोरस्ते चॅरीटेबल ट्रस्टतर्फे विविध क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करणार्‍या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये डॉ. सुरेशबाबा पवार, शांताराम सातभाई, अ‍ॅड. शशिकांत पवार, डॉ. दिलीप शिंदे, डॉ. प्रल्हाद डेर्ले, प्रा. नानासाहेब दाते, अमित फडोळ, अश्विनी बोरस्ते, शामराव मोगल, भाऊसाहेब खताळे, बबन दराडे, दीपक देवरे, विलास कड, विजय खालकर, भरत सोनवणे व कुमारी प्रतीक्षा कोटकर यांचा समावेश होता. सूत्रसंचालन प्रा. अशोक सोनवणे यांनी तर आभार अंबादास चौधरी यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या