Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशव्लादिमीर पुतिन लवकरच राष्ट्रपतीपद सोडणार?

व्लादिमीर पुतिन लवकरच राष्ट्रपतीपद सोडणार?

दिल्ली | Delhi

जगातील सर्वात शक्तीशाली नेता आणि गेल्या 20 वर्षांपासून राज्य करणारे व्लादिमीर पुतिन आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. व्लादिमीर पुतिन पुढीलवर्षी म्हणजेच २०२१ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार गेल्या काही दिवसांपासून पुतीन यांची तब्येत बरी नसल्याचे निरीक्षण समोर आले आहे. तसेच पुतिन यांची प्रेयसी आणि त्यांच्या दोन मुली पुतिन यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणत आहेत. पुतिन यांचे कुटुंब असून, कुटुंबातील सदस्यांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. त्यामुळे पुतिन हे जानेवारी महिन्यात सत्ता अन्य कुणाकडे तरी सोपवून कार्यमुक्त होऊ शकतात. रशियन राष्ट्रपती पार्किसन्सने ग्रस्त असून, हल्लीच्या छायाचित्रांमधून त्यांच्यामध्ये आजाराची लक्षणे दिसत आहेत. ताज्या व्हिडिओत त्यांची बोटे थरथरताना दिसल्याने त्यांना पार्किन्सनची लक्षणे दिसत असल्याचे म्हटले जात आहे. ही बातमी अशावेळी येत आहे जेव्हा रशियामध्ये पुतीन यांना तहहयात फौजदारी कारवाईपासून संरक्षण देण्यासाठीची याचिका दाखल करण्यात आली आहे.

पुतीन हे गेल्या दोन दशकांपासून पंतप्रधान म्हणून किंवा राष्ट्रपती म्हणून देशाच्या मुख्यपदावर आहेत. २०१४मध्ये ते या पदावर विराजमान झाले. त्यांनी नुकतीच अशी घटनादुरुस्ती सुचवली होती ज्यामुळे त्यांना २०३६पर्यंत पदावर राहता येईल. रशियाच्या ७८% मतदारांनी याला पाठिंबा दिला आहे. याच घटनादुरुस्तीत समलैंगिक विवाहांवर बंदी आणण्याचीही तरतूद आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या