Saturday, May 11, 2024
Homeक्रीडाIPL Title sponser : चीनी कंपनीला डच्चू, आता टाटा आयपीएल

IPL Title sponser : चीनी कंपनीला डच्चू, आता टाटा आयपीएल

भारताच्या टाटा कंपनीने (Tata)आता एक मोठं पाऊल उचललं आहे. आयपीएलच्या ( IPL)पुढच्या हंगामात दोन नवीन संघांची एंट्री झाली आहे. त्याचबरोबर आता आयपीएलबरोबर टाटा या कंपनीने आपलं नातं घट्ट केलं आहे.

रेल्वेचा प्रवास महागणार, वाचा कोणाला किती जास्त मोजावे लागणार पैसे

- Advertisement -

चीनची विवो कंपनी आयपीएलची टायटल स्पॉन्सर होती. पण आता बीसीसीआयने (BCCI) विवो कंपनीला डच्चू देत ही संधी टाटा कंपनीला दिली आहे. आता पुढच्या वर्षापासून टाटा कंपनी आयपीएलची टायटल स्पॉर्न्सर असणार आहे. आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने ( IPL)आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.

आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी ही माहिती दिली. भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक समूहांपैकी एक असलेला टाटा समूह पुढील वर्षापासून ही जबाबदारी स्वीकारणार आहे.

गतवर्षी चायनीझ वस्तूंवरील बहिष्काराची मागणी लक्षात घेता BCCIनं VIVOला माघार घेण्यास सांगितली होती आणि Dream 11नं यूएईत झालेल्या आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क मिळवले होते. पण, २०२१मध्ये पुन्हा VIVOकडे टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क आले होते. चायनीझ कंपनी VIVOनं २०१८मध्ये प्रती वर्ष ४४० कोटी यानुसार पाच वर्षांकरीता आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क मिळवले होते.

आयपीएलच्या इतिहासात टाटा पाचवा प्रयोजक

टाटा आयपीएलच्या इतिहासातील पाचवा प्रायोजक असणार आहे. आयपीएलचे नाव आतापर्यंत कसे बदलले, जाणून घ्या आणि प्रायोजकत्वासाठी किती पैसे मोजावे लागले.

• वर्ष 2008 ते 2012 – DLF IPL (रु. 40 कोटी प्रतिवर्ष)

• वर्ष 2013 ते 2015 – pepsi IPL आयपीएल (प्रति वर्ष ७९.२ कोटी)

• वर्ष 2016 ते 2017- Vivo IPL (रु. 100 कोटी प्रति वर्ष)

• वर्ष 2018 ते 2019- Vivo IPL (रु. 439.8 कोटी प्रति वर्ष)

• वर्ष 2020- ड्रीम 11 IPL (रु. 222 कोटी)

• वर्ष 2021- (Vivo IPL रु 439.8 कोटी)

• वर्ष २०२२- टाटा समूह

- Advertisment -

ताज्या बातम्या