Wednesday, April 24, 2024
Homeनगरश्री विशाल मंदिरात पुष्पवृष्टी

श्री विशाल मंदिरात पुष्पवृष्टी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

श्री गणेश जयंतीनिमित्त शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे विविध धार्मिक कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

दुपारी श्री गणेश जन्म उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

शहर बँकेचे संचालक शिवाजी कदम व सोनाली कदम यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. याप्रसंगी उद्योजक दिनेश आगरवाल, पराग नवलकर, पुजारी संगमनाथ महाराज, मयुर महाराज, आदिंसह विश्वस्त उपस्थित होते. जन्मोत्सवानिमित्त भाविकांनी अथर्वशिष्य, मंत्रोच्चरात पुष्पवृष्टी करण्यात आली. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

यावेळी भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. देवस्थानाच्यावतीने भाविकांची दर्शनाची मंडप व्यवस्था करण्यात आली होती. याप्रसंगी देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त रामकृष्ण राऊत, विजय कोथिंबीरे, पांडूरंग नन्नवरे, रंगनाथ फुलसौंदर, गजानन ससाणे, हरिश्चंद्र गिरमे आदी उपस्थित होते.

शिववरद प्रतिष्ठानच्यावतीने श्री गणेश जयंतीनिमित्त पटवर्धन चौकातील शिववरद गणपती मंदिरात विधीवत महाअभिषेक, आरती करुन भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नितीन डागवाले, अ‍ॅड. सुनिल सूर्यवंशी, अनिल शिंदे, सुभाष दारवेकर, शहाजी डफळ, बाबा वैद्य, राऊफ खान, सय्यद हुसेन, आशिष रासने, योगेश गणगले, बाळासाहेब डागवाले, अ‍ॅड.मंदार पळसकर, बाळासाहेब लोढा, रोहन डागवाले, विकास आव्हाड, संदिप नामदास, सुरम थापा, सागर गोरे, सचिन सप्रे, पिंटू डागवाले, तपन घारु, दिपक पिलगर व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या