Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरगोदावरी नदीतील विसर्ग 4791 क्युसेकवर

गोदावरी नदीतील विसर्ग 4791 क्युसेकवर

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

दारणाच्या पाणलोटातील (watershed of Darna) इगतपुरी (Igatpuri), घोटी (Ghoti) परिसरात दमदार पाऊस (Rain) झाल्याने दारणात पाण्याची आवक वाढल्याने दारणातून काल सकाळी 8 वाजता विसर्ग वाढविण्यात आला. दारणातून (Darna) 3296 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नांदूरमधमेश्वर (Nandurmadhameshwar) बंधार्‍यातून/गोदावरीतील विसर्ग (Visarg in Godavari) 1291 क्युसेक वरुन 3296 क्युसेक इतका वाढविण्यात आला आहे. गंगापूर धरण (Gangapur Dam) जवळपास 70 टक्के भरले आहे.

- Advertisement -

दारणाच्या पाणलोटातील (watershed of Darna) इगतपुरी ला काल सकाळी 6 वाजता मागील 24 तासांत 62 मिमी, घोटीला 50 मिमी पावसाची नोंद झाली. तर दारणाच्या भिंतीजवळ 30 मिमी पावसाची नोंद झाली. 100 टक्के भरलेल्या भावली च्या सांडव्यावरुन 135 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. काल तेथेही 54 मिमी पावसाची नोंद झाली. हे पाणी दारणात येत असल्याने दारणात 24 तासांत 143 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. काल सकाळ नंतरही या धरणाच्या पाणलोटात दमदार पाऊस झाला. त्यामुळे दारणात काल सकाळी 6 वाजता 1982 क्युसेक ने सुरु असलेला विसर्ग काल सकाळी 8 वाजता 3296 क्युसेक इतका करण्यात आला. यासाठी दारणाचे 4 वक्राकार गेट 1 -1 फुट इतक उचलण्यात आले आहेत. त्यातुन वेगाने पाणी नांदुरममधमेश्वर बंधार्‍याच्या दिशेने वाहत आहे.

नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत सायंकाळी 6 वाजता 4791 क्युसेक ने विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीतील पाणी वाढले आहे. काल सकाळी 1614 क्युसेक ने सुरु असलेला विसर्ग सकाळी 9 वाजता 3155 क्युसेक करण्यात आला. तर 11 वाजता 4035 क्युसेक इतका करण्यात आला. तर काल सायंकाळी 6 वाजता हा विसर्ग वाढवत 4791 क्युसेक इतका करण्यात आला. यासाठी नांदूरमधेश्वर बंधार्‍याचे सहा पैकी दोन गेट उचलण्यात आले आहेत. पहिले गेट एक मिटरने तर दुसरे गेट अर्ध्या मिटरने वर उचलण्यात आले आहे. या बंधार्‍यातुन गोदावरी चे दोन्ही कालवे पिण्याच्या पाण्यासाठी वाहत आहेत.

गंगापूर धरणाच्या पाणलोटात काल दिवसभरात हालका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत गंगापूरच्या भिंतीजवळ 71 मिमी पावसाची नोंद झाली. अंबोलीला 130 मिमी, त्र्यंबकला 57 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे या 24 तासांत गंगापूर मध्ये 366 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. यामुळे गंगापूरचा साठा काल सोमवारी सायंकाळी 6 वाजता 69.91 टक्के इतके भरले होते. काल दिवसभरात 11 तासात गंगापूर मध्ये 128 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. काल दिवसभरातील सकाळी 6 ते सायंकाळी 5 पर्यंत गंगापूर ला 12 मिमी, अंबोलीला 23 मिमी, त्र्यंबकला 32 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूर समुहातील गौतमी 42.02 टक्के, काश्यपी 36.55 टक्के इतके भरले आहे..

अन्य धरणांचा पाऊस मिमी मध्ये व कंसात टक्केवारी- मुकणे 0 (43.48 टक्के), वाकी 40 मिमी (25.67 टक्के), भाम 31 मिमी (50 टक्के), वालदेवी 22 मिमी (85.64 टक्के), कडवा 23 मिमी (37.21 टक्के), आळंदी 28 मिमी (51.68 टक्के). गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील कोपरगावला व राहाता येथे प्रत्येकी 4 मिमी पावसाची नोंद झाली. देवगावलाही 4 मिमी तर ब्राम्हणगावला 3 मिमी ची नोंद झाली. चितळीला 15 मिमी पाऊस काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासात झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या