Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याविसा टीएसडी रन ऑफ नाशिक

विसा टीएसडी रन ऑफ नाशिक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

वेर्स्टन इंडिया स्पोर्टस् असोसिएशनतर्फे (Verston India Sports Association) घेण्यात येणार्‍या टीएसडी रॅन ऑफ नाशिक (TSD Run of Nashik) अर्थात वेग आणि आंतर स्पर्धेमध्ये चारचाकी (Four wheeler) विशेष महिला गटात मयूरी कुलकर्णी (Mayuri Kulkarni) व योगिता पाटील (Yogita Patil) या जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. मयूरी कुलकर्णी या देशदूतमध्ये (deshdoot) ईडीपी विभागप्रमुख (Head of EDP Department) म्हणून कार्यरत आहेत.

- Advertisement -

चारचाकीच्या गटात सूरज देशमुख (Suraj Deshmukh) आणि समीर मालवदे (Sameer Malwade) यांनी पारितोषिक पटकावले. तर दुचाकी गटात लीना खैरनार (Leena Khairnar), अंकिता काळे (Ankita Kale) प्रथम आल्या. ई-बाईकमध्ये (E-bike) अबीद झैद (Abid Zaid) या जोडीने प्रथम क्रमांक मिळवला.

कोविडच्या (covid-19) प्रादुर्भावामुळे दोन वर्षांनंतर घेण्यात आलेल्या या रॅलीमध्ये चांगल्या संख्येने स्पर्धकांनी भाग घेतला. सुरुवातीला हॉटेल कोर्ट यार्डचे (Hotel Court Yard) अमोल मोरे (amol more), माय एफएम रेडिओचे (My FM radio) शँकी पहाडे (shanky pahade), ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Rural Superintendent of Police Sachin Patil), अविनाश भिडे (avinash bhide) यांनी स्पर्धेकांना झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात केली. स्पर्धेचा उद्देशच सुरक्षित व नियम पाळून वाहने चालवावी व स्पर्धेचा आनंद मिळावा हाच होता.

हॉटेल कोर्ट यार्ड, गिरणारे (girnare), बेजे (beje), गंगापूर, महिरावणी (mahiravani), पहिणे (pahine), वाडीवर्‍हे (vadivahre), कावनई (kavnai) असा मार्गक्रमण करत चारचाकी स्पर्धेकांनी 140 व दुचाकी स्पर्धेकांनी 85 तर ई-बाईक चालकांसाठी 35 किलोमीटर अंतर पार करून ही स्पर्धा पूर्ण केली.

रविवारी झालेल्या या स्पर्धेच्या वेळी धुके (fog) असल्याने सुरुवातील वाहनचालकांना थोडा त्रास झाला. मात्र, कालांतराने स्पर्धा सुरुळीत झाल्या. मार्गावर गावकर्‍यांनी स्पर्धेकांचा उत्साह वाढवला. डोंगराळ रस्ते, शहरी रस्ते अशा सर्व भागातून चांगल्या-वाईट रस्त्यावर स्पर्धेकांनी मार्गाक्रमण केले. रविवारी संध्याकाळी झालेल्या पारितोषिक वितरण संमारंभात स्पर्धेकांना बक्षिसे देण्यात आली.

चारचाकी

सूरज देशमुख – समीर मालवदे (0.07.39)

मयूरी कुलकणी – योगिता पाटील (0.11.58)

कनक पटेल – पल्लवी धर्माधिकारी (0.20.20)

दुचाकी

लीना खैरनार – अंकिता काळे (0.22.13)

चंद्रकांत गायकवाड – तन्मय शिंपी (0.27.39)

संतोष सरकाळे – आदित्य ठक्कर (0.37.09)

ई -बाईक्स

अबिद – झैद (0.18.43),

तौफिक-शाहबाज (0.26.56),

नागेश पारवे – राहुल परदेशी (0.41.44)

महिला विशेष गट

मयूरी कुलकर्णी, योगिता पाटील (0.11.58)

कनक पटेल – पल्लवी धर्माधिकारी (0.20.20)

रिया शेटे-शिल्पा शेटे (0.37.58)

- Advertisment -

ताज्या बातम्या