Wednesday, May 8, 2024
Homeनगरव्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून शरद पवार कार्यकर्त्यांशी साधणार संवाद - फाळके

व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून शरद पवार कार्यकर्त्यांशी साधणार संवाद – फाळके

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार उद्या 12 डिसेंबरला 80 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.

- Advertisement -

त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते शरद पवार यांची भेट घेतात; पण यंदा करोना संकटामुळे पवार व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रवादी नेते व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

फाळके म्हणाले, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी 12 डिसेंबरला सकाळी 11 वाजता ही रॅली सुरू होणार आहे. याशिवाय काही ठरावीक जिल्ह्यांच्या ठिकाणी थेट प्रक्षेपणही होईल. राज्यातील 36 जिल्हे व 350 पेक्षाही जास्त तालुक्यांत व्हर्च्युअल रॅलीचा कार्यक्रम होईल. पक्षाच्या नवीन संकेतस्थळाचे उद्घाटन होईल. या संकेतस्थळातून पक्षाच्या सभासदत्वाचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल.

राज्यातील मंत्री नवाब मलिक व दिलीप वळसे पाटील काही महत्त्वाच्या योजना जाहीर करतील. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याहस्ते आदिवासींना करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य किटचे वाटप करण्यात येणार आहे.

पक्षातर्फे शरद पवार यांच्यावर लघुपट व माहितीपट तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. कर्जतमधून एनसीसीचे एक पथक बारामतीला जाणार आहे. याशिवाय, राज्यातील कमी पडत असलेला रक्तसाठा लक्षात घेता, 13 ते 20 डिसेंबरदरम्यान रक्तदान शिबिर होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या