Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजन'व्हायोलिनचा जादूगार' हरपला; प्रभाकर जोग काळाच्या पडद्याआड

‘व्हायोलिनचा जादूगार’ हरपला; प्रभाकर जोग काळाच्या पडद्याआड

पुणे | Pune

प्रसिद्ध व्हायोलिनवादक आणि संगीतकार प्रभाकर जोग (Prabhakar Jog) (८९) यांचे आज सकाळी पुण्यात घरी निधन झाले.

- Advertisement -

प्रभाकर जोगांच्या व्हायोलिन वादनातून जणू शब्द ऐकू येतात, त्यामुळे त्यांचं व्हायोलिने ’गाणारे व्हायोलिन’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी या नावाने अनेक ठिकाणी कार्यक्रमही केले होते.

वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी पुण्यात वाडय़ांमधून सव्वा रूपया आणि नारळाच्या बिदागीवर व्हायोलिन वादनाच्या कार्यक्रमांना सुरूवात केली. पुढे त्यांनी संगीतकार सुधीर फडके यांचे सहाय्यक म्हणून काम केले.

‘गीतरामायणा’तील गाण्यांना प्रभाकर जोग यांच्या व्हायोलिनचे सूर लाभले आहेत. बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या पाचशे कार्यक्रमांना त्यांनी साथ दिली.

संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक म्हणून तब्बल सहा दशकांहून जास्त वर्षे कार्यरत असलेल्या प्रभाकर जोग यांचे मराठी आणि हिंदी चित्रपट संगीताबरोबरच भावसंगीतातही मोलाचे योगदान आहे.

‘व्हायोलिन वादनानं गानरसिकांना सहा दशकांहून अधिक काळ मनमुराद आनंद देणारे ज्येष्ठ संगीतकार,प्रसिद्ध व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांच्या निधनानं भारतीय संगीतातील महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे.त्यांचं निधन ही राज्याच्या संगीत, कलाक्षेत्राची मोठी हानी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या