Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यासुनो द्रौपदी! शस्त्र उठा लो...; ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर...

सुनो द्रौपदी! शस्त्र उठा लो…; ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर विनेश फोगाटचं ट्विट

दिल्ली | Delhi

दिल्ली पोलिसांनी अखेर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध १५०० पानांचे आरोपपत्र दाखल केलं आहे. या नंतर कुस्तीपटू विनेश फोगटने एक कविता शेअर केली आहे. विनेश फोगटने तिच्या अधिकृ ट्विटर अकाऊंटवरून कवितेचा फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये न्याय मिळण्यासाठी मागणी केली आहे.

- Advertisement -

विनेश फोगाटने शेअर केलेली कविता काय आहे?

सुनो द्रौपदी! शस्त्र उठा लो

अब गोविंद ना आएंगे…

छोड़ो मेहंदी खड्ग संभालो

खुद ही अपना चीर बचा लो

ध्यूत बिछाए बैठे शकुनि

मस्तक सब बिक जाएंगे

सुनो द्रौपदी! शस्त्र उठा लो

अब गोविंद ना आएंगे

तुम कब तक आस लगाओगी

बिके हुए अखबारों से कैसी रक्षा मांग रही हो

दुशासन दरबारों से स्वयं जो लज्जाहीन पड़े हैं

वे क्या लाज बचाएंगे

सुनो द्रौपदी! शस्त्र उठा लो

अब गोविंद ना आएंगे।

ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक अन् मारहाण; Video शेअर करत म्हणाल्या…

पुष्यमित्र उपाध्याय यांची ही कविता आहे. We Want Justice असं म्हणत विनेश फोगाटने ही पूर्ण कविता पोस्ट केली आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून ऑलिम्पिक पदकविजेते बजरंग पुनिया, साक्षी मलिक, ऑलिम्पियन विनेश फोगट यांच्यासह देशातील अनेक दिग्गज कुस्तीपटू ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत. कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी १५ जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे आश्वासन सरकारने आंदोलक कुस्तीपटूंना दिले होते. शासनाकडून आश्वासन मिळाल्यानंतर पैलवानांनी आंदोलन स्थगित केले.

इंदुरीकर महाराज गोत्यात! ‘त्या’ विधानावरून न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश, अडचणी वाढल्या

दिल्ली पोलिसांनी गुरुवारी (१५ जून) ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Singh) यांच्यावरील POCSO अंतर्गत आरोप रद्द करण्याची शिफारस केली आणि लैंगिक छळ आणि पाठलाग केल्याच्या आरोपांप्रकरणी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी पटियाला हाऊस कोर्टात अल्पवयीन कुस्तीपटूच्या लैंगिक छळ प्रकरणासंदर्भात रद्द अहवाल दाखल केला आहे. ४ जुलै रोजी न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होणार आहे. त्याचवेळी, सिंग यांच्यावर सहा कुस्तीपटूंच्या आरोपांप्रकरणी पोलिसांनी राऊस अव्हेन्यू न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यासाठ न्यायालयाने २२ जूनला सुनावणी होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या