Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिकच्या विनायकने बनवले मराठीतले बुद्धिबळ अँप

नाशिकच्या विनायकने बनवले मराठीतले बुद्धिबळ अँप

नाशिक | Nashik

नाशिकमधील तरुण बुद्धिबळपटू विनायक वाडिले याने बुद्धिबळाविषयी चेसविकी नावाचे एक अँप तयार केले आहे.

- Advertisement -

सदर अँप अँड्रॉइड या प्लँटफाँमवर उपलब्ध असुन ३ एमबी एव्हढी नाममात्र जागा लागते. सदर अँपला बुद्धिबळप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळत आहे .

बुद्धिबळ म्हटले की बहुतेकांना काहीतरी अवघड आहे असे वाटते, मात्र हा समज खोटा ठरवत हे अँप बुद्धिबळासाठी किती सोपे असल्याचे विनायकने सांगितले. या अँपमध्ये बुध्दिबळातील हजारो कोडी आहेत. या ठिकाणी बुद्धिबळाविषयी प्रश्नमंजुषा देखील आहेत. ज्यात जिंकल्यास आकर्षक बक्षीसे देखील मिळणार आहे.

या अँपचे महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे, तूम्ही येथे आपले बुद्धिबळ विषयक प्रश्न विचारू शकता, तसेच या अँपमध्ये वेबिनार या संकल्पनेद्वारे बुद्धिबळातील विविध ग्रँडमास्टर आणि आंतरराष्ट्रीय मास्टर मराठी भाषेमधून बुद्धिबळाचे धडे देणार आहेत. कोणत्याही अँपद्वारे बुद्धिबळाचे मराठीमधुन धडे मिळण्याची, ही पहिलीच वेळ आहे .

या अँपचे निर्माते असणाऱ्या विनायक वाडिले याने या आधी आशिया खंडातील बुद्धिबळविषयक पहिले संकेतस्थळ देखील तयार केले होते. त्याला देखील उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या