Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे गटाचे 22 आमदार आणि ९ खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात? राजकारणात पुन्हा...

शिंदे गटाचे 22 आमदार आणि ९ खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात? राजकारणात पुन्हा खळबळ

मुंबई | Mumbai

शिंदे गटाचे (Shinde Group) 22 आमदार आणि नऊ खासदार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला आहे. या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे…

- Advertisement -

विनायक राऊत म्हणाले की, ‘मंत्री शंभूराज देसाई यांना काय करायचे आहे ते करू द्या. पण सध्या शिंदे गटातील बऱ्यात आमदारांमध्ये असंतोष आहे. शिंदे गटातील असंतोषाला पहिली वाचा खासदार गजानन कीर्तिकर यांनी फोडली. अनेक आमदारांचा भ्रमनिरास झाला आहे. आमदारांना ५० खोके आणि कोट्यवधी रुपयांचा निधी देण्याचे कबूल करण्यात आले होते. मात्र, आता तसे घडताना दिसत नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

IPL 2023 Final : अंतिम सामना जिंकल्यानंतर महेंद्रसिंह धोनीची निवृत्तीबाबत मोठी घोषणा; पाहा व्हिडीओ…

‘काही मंत्री सोडले तर उरलेल्या आमदारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. अनेकांना फसवणूक झाल्याचे वाटत आहे. याची सुरुवात खासदार गजानन कीर्तिकर यांनी केली आहे, असे राऊत म्हणाले.

‘शिंदे गटाचे २२ आमदार आणि नऊ खासदार हे उद्धव ठाकरे यांच्या सर्वांच्या संपर्कात आहेत. तरीही या आमदारांना ‘मातोश्री’चे दरवाजे या गद्दारांना उघडे राहणार नाही. शिंदे गटाच्या आमदारांबाबत उद्धव ठाकरे यांचा निर्णय सर्वांना मान्य असेल, असेही राऊत म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Gautami Patil : बोल तू होतेस का माझी परी?; शेतकरी पुत्राकडून गौतमीला लग्नाची मागणी

- Advertisment -

ताज्या बातम्या