Thursday, April 25, 2024
Homeनगर15 पेक्षा अधिक संक्रमित व्यक्ती असलेली गावे 100 टक्के लॉकडाऊन करा

15 पेक्षा अधिक संक्रमित व्यक्ती असलेली गावे 100 टक्के लॉकडाऊन करा

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

15 पेक्षा अधिक करोना संक्रमित असलेली गावे 100 टक्के लॉकडाऊन करावीत अशी सूचना प्रांताधिकारी गणेश पवार यांनी केली.

- Advertisement -

नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे प्रांताधिकारी गणेश पवार व तहसिलदार रुपेशकुमार सुराणा यांनी कोविड 19 संदर्भात नुकतीच आढावा बैठक घेतली. त्यावेळी प्रांताधिकारी बोलत होते.

बैठकीसाठी नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर शेलार, तालुका वैद्यकिय अधिकारी अभिराज सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव लंघे उपस्थित होते. यावेळी सलाबतपूर व शिरसगाव गणातील कोविड 19 रोगाच्या फैलावाविषयी प्रांताधिकारी गणेश पवार यांनी माहिती जाणून घेतली.

परिसरातील करोना स्थितीचा आढावा घेताना सलाबतपूर व शिरसगाव येथील करोना रुग्ण संख्या, संपर्कातील रुग्णांचे विलगीकरण, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा, लसीकरण या विषयी प्रांताधिकार्‍यांनी माहिती जाणून घेतली. तसेच जास्तीत जास्त लसीकरण करण्यासंदर्भात सुचना केली.

करोना संक्रमितांची संख्या वाढू नये यासाठीं काय उपाययोजना करता येतील यासंदर्भातही चर्चा करण्यात आली. ज्या गावात पंधरापेक्षा जास्त रुग्ण असतील ते गाव शंभर टक्के लॉकडाऊन करण्याच्या सुचना देण्यात आल्या.

तसेच अत्यावश्यक सेवा देणार्‍या दुकानदारांच्या खबरदारीचा उपाय म्हणून करोना चाचणी करण्याचे सांगण्यात आले.

यावेळी शिरसगाव, सलाबतपूर गणातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. दिपक डिंबर, डॉ. प्रिया कर्डिले, उपसरपंच दत्तात्रय पोटे तसेच दोन्ही गणातील गावांचे सरपंच, पोलीस पाटील, आशा सेविका, वैद्यकिय कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या