Friday, April 26, 2024
Homeजळगावतालुका पोलिसांकडून गावठी दारुच्या भट्ट्या उद्ध्वस्त

तालुका पोलिसांकडून गावठी दारुच्या भट्ट्या उद्ध्वस्त

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

पोलीस ठाण्यांच्या (police stations) हद्दीत असलेल्या गावठी दारु भट्ट्यांवर (Village liquor kilns) उद्धवस्थ करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. तालुका पोलीस स्टेशनच्या (. Taluka Police Station) हद्दीतील तीन गावांमधील (three villages) गावठी दारुच्या अड्ड्यांवर ()village liquor haunts तालुका पोलीसांच्या पथकाने धाड (Raids) टाकून, दारुचे अड्डे उध्वस्त केले (liquor dens destroyed) आहेत. या कारवाईत पोलीसांनी पावणे दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट करत, पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

आक्षेपार्ह वक्तव्याने जळगावात तणाव

जळगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये गावठी दारुचे अड्डे असून, भट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत पध्दतीने दारू तयार करून विक्री केली जात आहे. त्याची माहिती तालुका पोलीसांना मिळाल्यानंतर शनिवारी सायंकाळी व रविवारी सकाळी ही कारवाईचे सत्र राबविण्यात आले. शनिवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील भोलाणे या गावात तापी नदीच्या काठालगत भीमराव कोळी यांच्या हातभट्टीवर धाड टाकण्यात आली.

VISUAL STORY : माझ्या जगण्याचं कारण…” दिवंगत बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्माची शेवटची पोस्ट

या कारवाईत 19 ड्रम कच्चे व गरम 3400 लिटर रसायन चालू भट्टीतील दारुसह एकूण 87 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. यासह गाढोदा येथे प्रवीण भगवान सोनवणे यांच्या गावठी हातभट्टीचा दारुचा अड्डा उध्वस्त करण्यात आला. तिसरी कारवाई खोटेनगर येथील आरोपी जयवीर राजपुत याच्या ताब्यात देशी दारू बॉटल मिळून आल्या. या कारवाईत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

कर्जाचा बोजा : शेतकऱ्याची विष प्राशन करुन आत्महत्या

दुसर्‍या दिवशीही धडक कारवाई

पोलिसांकडून दुसर्‍या दिवशी रविवारी देखील कारवाईची मोहीम सुरु होती. यामध्ये भोलाणे येथे महेंद्र शिवनाथ कोळी याच्या 7 ड्रम कच्चे व गरम 1200 लिटर रसायन चालू भट्टीतील तयार दारूसह 35 हजार रुपयांचा मुद्देमाल याठिकाणी आढळून आला.

महिलेच्या डोक्यावर कुर्‍हाडीने वार, चौघांविरूध्द गुन्हा दाखल

यासह दापोरा शिवारातील कुरकुर नाल्याजवळ अशोक उर्फ काल्या रामदास सोनवणे याच्या 4 ड्रम कच्चे व गरम 700 लिटर रसायन चालू भट्टी वरील तयार दारू सह 19 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या