Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedगावाकडची दिवाळी

गावाकडची दिवाळी

आली माझ्या घरी हि दिवाळी स्वप्नरंगात न्हाऊन आली आली माझ्या घरी हि दिवाळी…हे गाणं ऐकले कि दिवाळी सणाची चाहूल लागते.आमच्या लहाणपणी गावाकडील दिवाळी खूप छान साजरी केली जायची. गावी शेतकरी कुटूंबातील सगळी मंडळी असायची शक्यतो एखाद्या घरातीलचं एखादी व्यक्ती नोकरी करायची पन बहुतेकजण घरीचं असायचे त्यामुळे शेतीच्या ऊत्पन्नातून जे काही मिळेल त्याच तुटपुंज्या पैशातून पन अमाप सुखसमाधान आनंद देनारी दिवाळी तेव्हा साजरी केली जायची.रूढी परंपरा जपल्या जायच्या. जसे कि वसुबारस या दिवसापासून दिवाळी या सणाची सुरूवात होते.

ग्रामीण भाग म्हटले कि गावातील सगळे लोक शेतकरी कुटूंबातीलचं असतात.प्रत्येकाच्या घरी जनावरांचा गोठा हमखास असतोच.त्यामधे सर्जाराजाची जोडी खिल्लारी गावरान गाय नक्कीच असतात.मग या वसुबारस च्या दिवशी गावातील प्रत्येक मायमाऊली गोठा मातीने सारवून घ्यायच्या.त्याला मस्तपैकी चुनाकाऊ ने रंगवायच्या.मग संध्याकाळी या मायमाऊली म्हणजेच गायवासराची पुजा करून गोठ्यात दिवे लावले जायचे.त्यांच्यासाठी बाजरीच्या भाकरीचा गुळाचा मलिदा केला जायचा.गोठा कसा ऊजळून निघायचा.हे सार द्रुश्य पाहून वाटायचे नक्रीचं लक्ष्मीचे आगमन होईल.आज आपण शहरी भागातील लोक या सर्व गोष्टींना मुकलो आहोत.आजही आपण जरी शहरातून गावाला दिवाळी साजरी करायला जरी गेलो तरी जुनी दिवाळी जशी साजरी करायचो तशी दिवाळी आपल्याकडून साजरी होत नाही.

- Advertisement -

कारण गावालाही आपण सिमेंटकाँक्रेटनेच नटवलय आपण.गावाकडच्या मातीने आपले पाय भरू नये एवढी खबरदारी जरी आपण घेतलेली असली तरी आपल्या मातीत आपले पाय रूतायलाचं हवे ते रूतले तरच गावाकडची ओढ आपल्याला कायमची असेल.दिवाळपहाटेच्या दिवशी घराती पुरूषमंडळींना पाटावर बसून घरातील महिला तेलामधे सुगंधी ऊटणे लावून मस्त चोळून मळ काढुन द्यायच्या मग मस्त चुलीवर तापवलेले कडक पाणी अंघोळीला दिल जायचं.अशा पद्धतीने घरातील पुरूषमंडळी लहानथोर यांचा आदर केला जायचा.वसुबारसनंतर मग घरातील मायमाऊल्या जिला जसं जमेल तस फराळ बनवायला लागायच्या.आताच्या मायमाऊलीकडे भरमसाठ पैसा आहे त्यामुळे ति दमायला नको म्हणते मग ति आचारी लावूनच दिवाळीचे फराळ बनवून घेते.

एका दिवसात सगळे फराळ तयार होते.यामुळे आनंद साजरा केला जात नाही कारण घरात आई स्वत: जेव्हा दिवाळीचं गोडधोड घरात स्वत:च्या हाताने बनवते ति मजा काही वेगळीचं असते.ईकडून तिकडे जातायेता आईने  करंजीसाठी किसलेल्या खोबरयामधे हात घालून ते खोबरं चोरून खाण्याची मजा वेगळी असायची.त्यातल्या त्यात आईने पाहिलं अन पाठीत धपाटा घातला तरी त्यामधे सुद्धा आनंद वाटायचा.आई स्वत: जेव्हा तिच्या हाताने निगुतिने गोडधोड बनवते तेव्हा त्या पदार्थामधे साखरेपेक्षाही गोड असे ति प्रेम टाकत असते कारण तिच्या मुलांने ते खायचे असते.आजची आई सर्व काही आयतं म्हणजेचं रेडिमेड पहाते सगळचं.जुन्या काळी पैसा नसायचा मग दिवाळी आली कि साठवून ठेवलेल्या हरभरयांना जात्यावर भरडले जायचे त्याची घरीचं दाळ बनवली जायची.

मग ती दाळ जात्यावरचं दळली जायची.मशिन नावाचा कोणताही प्रकार नव्हता.शेतामधे भुईमूग करडई पेरलेल्या असायच्या मग करडईचे तेल घाण्यावरून काढून आणले जायचे.भुईमूगाच्या शेंगा फोडून तेदेखील तेल काढून आणले जायचे.डुप्लिकेट काहीही विकत आणले जात नव्हते सगळं घरचेच नैसर्गिक असायचे त्यामुळे तब्येती धस्टपुष्ट असण्यासोबतचं आजारी न पडणारया आणि आजार न जडणारया होत्या.सगळं अन्नधान्य पौष्टिक अन शेतात पिकलेलेचं असायचे.दुध गावरान तूप हे कधी कुणी विकत घेत नव्हते तेदेखील घरचेच असायचे.दिवाळीचे पदार्थ म्हणजे गुर्हाळावरील गुळ घरची बाजरी यांच्या आईने बनवलेल्या पौष्टीक लोहयुक्त कापण्या खमंग करंज्या नविन शब्द पन कानुले म्हटले जायचे ते पन खमंग असायचे.

आज अनेक पदार्थ आपण बनवतो पन भेसळयुक्ततं सगळं.आणि तितका गोडवा गोडी प्रेम नक्कीच या पदार्थांमधून मिळत नाही.तेव्हा दिवाळीला घरातील मोठी व्यक्ती फटाके वाजवायची बाकी सदस्य फक्त पहात रहायचे.आतासारखे मोठा आवाज आणि प्रदूषणाला आमंत्रण देनारी धूर सोडणारी फटाके तेव्हा नव्हती.गोल गोल फिरणारी मामी थोडा मोठा आवाज करनारा मामा हि तेव्हाची फटाक्यांची नावे बर का ! ठराविक प्रकार होते फटाक्यांमधे पन समाधानी व्रुत्तीमाणसाच्या मुलांच्या अंगी होती.आता अनंत सुविधा पन तरी मनुष्यप्राणी समाधानी नाही असचं वाटते.काही म्हणा पन आगळीवेगळी आणि प्रेमाची दिवाळी असायची जुन्या काळी.आज आपण सगळे नक्कीच त्या दिवाळीला मिस करतोय हे नक्कीचं….

– आशा सुधीर साठे, अहमदनगर

- Advertisment -

ताज्या बातम्या