Thursday, April 25, 2024
Homeनगरग्रामविकास अधिकार्‍याला धक्काबुक्की, एका विरुद्ध गुन्हा

ग्रामविकास अधिकार्‍याला धक्काबुक्की, एका विरुद्ध गुन्हा

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

मद्यधुंद अवस्थेत ग्रामपंचायत कार्यालयात (Grampanchayat Office) येवून ग्रामविकास अधिकार्‍याला शिवीगाळ करुन धक्काबुक्की करणार्‍याविद्ध तालुका पोलीस ठाण्यात (Sangamner Taluka Police Station) सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना तालुक्यातील अंभोरे (Ambhore) येथे घडली.

- Advertisement -

पुढील आठवड्यापासून झेडपीच्या शाळा सकाळी भरणार?

विशाल संजय गायकवाड (रा. अंभोरे, ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे. विशाल गायकवाड हा शुक्रवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास दारुच्या नशेत अंभोरे (Ambhore) ग्रामपंचायतीमध्ये गेला. तेथे त्याने गाय गोठा यादी दाखविण्याची मागणी ग्रामविकास अधिकारी अरुण जेजूरकर यांच्याकडे केली. जेजूरकर यांनी त्याला ‘तू आता दारुच्या (Alcohol) नशेत आहेस, उद्या सकाळी ये’ असे म्हटले. याचा राग येवून विशाल गायकवाड याने जेजूरकर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

‘त्या’ बड्या हॉस्पिटलचा ना-हरकत दाखला खोटा

तू शिवीगाळ करु नकोस असे समाजावून सांगत असतांना गायकवाड याने जेजूरकर यांची शर्टची गचांडी पकडून धक्काबुक्की केली. त्यावेळी रामनाथ दशरथ बर्डे, गणेश भिमराज साळवे यांनी विशाल गायकवाड यास बाहेर काढले. त्यावर गायकवाड याने ग्रामपंचायतीला कार्यालयाला बाहेरुन कडी लावून घेतली. त्यामुळे ग्राम विकास अधिकारी व कर्मचारी यांना बाहेर पडण्यास अडथळा निर्माण करीत सरकारी कामात अडथळा आणला. त्यामुळे अरुण जेजूरकर यांनी विशाल गायकवाड याच्या चुलत्याला बोलावून घेतले. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाची कडी उघडून विशाल याला तेथून घेवून गेले.

महापशुधन एक्सपोत १२ कोटीचा रेडा, ५१ लाखांचा घोडा अन् दीड फूट उंचीची मेंढी!

दरम्यान काही कालावधीनंतर पुन्हा विशाल गायकवाड हा हातात लोखंडी रॉड घेवून ग्रामपंचायत कार्यालयात आला. त्याने हातातील रॉडने ग्रामविकास अधिकार्‍यांच्या केबिनचा दरवाजा तोडत नुकसान केले. व जेजूरकर यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत ग्रामविकास अधिकारी अरुण जेजूरकर यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात (Sangamner Taluka Police Station) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी विशाल गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 164/2023 भारतीय दंड संहिता 353, 342, 323, 504, 506, 427 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप हे करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या