Wednesday, May 8, 2024
Homeजळगावगाव विकासासाठी पैसा नव्हे मानसिकता हवी!

गाव विकासासाठी पैसा नव्हे मानसिकता हवी!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

पैसा Money ही विकासासाठी development समस्या problem नाही, गावाचा विकास करण्यासाठी मानसिकता Mindset नसणे ही मोठी समस्या, टीका टीपण्णी करण्यापेक्षा, इतरांच्या चुका दाखविण्यापेक्षा समन्वयाने coordination काम करा, लोकप्रतिनिधी म्हणून सरपंच म्हणून, सदस्य म्हणून गावातील समस्या प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न करा. तर हिवरेबाजारप्रमाणे आपले गाव आदर्श गाव Ideal village ठरु शकते. जिल्हा परिषद,Zilla Parishad पंचायत समिती Panchayat Samiti आणि ग्रामपंचायत Gram Panchayat या तिघांनी एकत्र येवून काम केले तरच स्वावलंबी गाव आणि बलशाली भारताचे स्वप्न पूर्ण करु शकतो, असे प्रतिपादन आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष तथा हिरवे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार Sarpanch Padma Shri Popatrao Pawar यांनी रविवारी जळगावातील सरपंच मेळाव्यात बोलतांना व्यक्त केले.

- Advertisement -

सरपंच परिषदेच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे जळगावातील आदित्य लॉन येथे रविवारी सरपंच मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी खासदार रक्षा खडसे उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष तथा हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जि.प.अध्यक्षा ना. रंजना पाटील, खासदार उन्मेश पाटील, आमदार शिरिष चौधरी, आ.मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, सरचिटणीस अ‍ॅड.विकास जाधव आदींची उपस्थिती होती.

या मेळाव्यात जळगाव जिल्ह्याच्या वतीने पोपटराव पवार यांचा नागरी सत्कारही ही करण्यात आला. यावेळी खा. उन्मेश पाटील, आ.मंगेश चव्हाण, खा.रक्षा खडसे यांनी मनोगत व्यक्त करत राजकारणीतील अनुभव कथन केले. सूत्रसंचालन व आभार सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक युवराज पाटील यांनी मानले. यशस्वितेसाठी जिल्हा समन्वय बाळू धुमाळ,श्रीकांत पाटील, बाळू चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.

मेळाव्यात वाद पेटला

सूत्रसंचालन करतांना युवराज पाटील हे आ. मंगेश चव्हाण यांच्या मनोगताचा सरपंच देत, सरपंचांची ताकद खूप मोठी आहे. सरपंच हा तालुक्याताचा आमदार तसेच खासदार बनवू शकतो. तसेच मेळाव्यात गिरीश महाजन उपस्थित असते तर गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांच्या चांगलीची जुगलबंदी झाली असते असे म्हणाले. यावरुन उपस्थित एका सरपंचाने या वक्तव्याचा विरोध केला. तसेच राजकारणाशी सरपंचांचा संबंध नाही, या उद्देशातून हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. तर राजकारणावर का बोलले जात आहे. असे म्हणत आरडाओरड करत गोंधळ घातला. अखेर आयोजक युवराज पाटील यांनी संबंधितांची माफी मागितल्यावर वादावर पदडा पडला.

…तर कमिशन घेतात

मेळाव्यात पाचोरा, चाळीसगाव सह विविध तालुक्यातील लोकनियुक्त सरपंचांना बोलण्याची संधी देण्यात आली. यावेळी सरपंचांनी आतापर्यंत गावात काय केलं हे सांगितले. चाळीसगाव तालुक्यातील सरपंचाने विकासासाठी निधी मागितला तर काही आमदार, जि.प.सदस्य हे कमिशन मागतात, असे सांगितले. सरपंचाच्या उपस्थित मान्यवरांचे चेहरे चांगलेच फिके पडलेले दिसून आले. लोकप्रतिनिधी हे गावात विकास कामांसाठी निधी देतांना खरच कमिशन घेतात का? असाही प्रश्न यावेळी उपस्थित झाला.

...तर प्रत्येक गाव स्वावलंबी होईल

पोपटराव पवार मनोगतात बोलतांना पुढे म्हणाले की, जिंकला ही हवेत उडायच नाही, आणि हरलाच तर डिप्रेशनमध्ये जायच नाही. हिवरेबाजार गावात महापुरूषांचे पुतळे नाहीत. महापुरूषांचे पुतळे उभारण्यापेक्षा त्यांचे विचार कृतीत आणावेत, पक्ष, पद बाजूला ठेवून संस्काराच्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. केवळ चेकवर स्वाक्षरी करायला मिळते, म्हणून सरपंच बनू नका. काही उद्देश ध्येय डोक्यासमोर ठेवा. तर तुम्ही सुध्दा तुमचे गावाचा हिरवेबाजारप्रमाणे विकास घडवू शकता. गावाचे नेतृत्व हा सरपंच करत असतो. सरपंचाने सर्वांना सोबत घेवून शासनाच्या योजना लोहसहभागातून राबविल्या तर प्रत्येक गाव स्वावलंबी होईल असेही पोपटराव पवार म्हणाले.

जिल्ह्यात सरपंच भवन उभारणार

सरपंच भवन उभारण्यासाठी जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी पाठपुरावा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दखल घेत, तसेच जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 50 लक्ष निधी देवून असे आश्वासन दिले. गुलाबराव पाटील यांनी मनोगतात फटकेबाजी केली. ग्रामसेवकांना महामंडलेश्वरांची उपमा देत ते म्हणाले, सरपंचांनी अंगठा बहाद्दर न राहता, सर्व कायदे, योजनांचा अभ्यास करावा. व त्यादृष्टीने गावाचा विकास करावा. कुठल्याही गावात पाण्याची समस्या असेल कळवा, ती पूर्ण करुन देण्याचे काम करेन असेही मंत्री पाटील म्हणाले. महिलांना कारभार सांभाळू द्याव, नाहीतर सरपंच महिला अन् खुर्ची सांभाळतो तिचा पती असे टोलाही यावेळी मंत्री पाटील यांनी उपस्थितांना लगावला. सरपंच हा ग्रामविकासातील महत्वाचा दुवा असून गावाच्या विकासाप्रमाणेच आमदार, खासदाराची सरपंचाशिवाय प्रगती नसल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या