Friday, April 26, 2024
Homeनगरबुडणार्‍या तिघांना वाचविणार्‍या युवकाचा मृत्यू

बुडणार्‍या तिघांना वाचविणार्‍या युवकाचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विळद घाट (Vilad Ghat) (ता. नगर) येथे धबधब्याखाली पाण्यात पोहोण्यासाठी (swim in the water) गेलेल्या 14 ते 15 युवकांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू (Youth Death by Drowning) झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. मयूर नरेश परदेशी (वय 21 रा. मोची गल्ली, नगर) असे मृत्यू (Death) झालेल्या युवकाचे नाव आहे.

- Advertisement -

शहरातील मोची गल्लीतील (Mochi Galli) 14 ते 15 युवक रविवारी नगर तालुक्यातील विळद घाट येथील गवळीवाडा (Gavaliwada) येथील धबधब्यावर (waterfall) फिरण्यास गेले होते. धबधब्याखाली असलेल्या पाण्यात युवक पोहत होते. परंतु, त्यांच्यापैकी तीन युवक पोहताना बुडण्याच्या बेतात होते. त्यांना मयूर परदेशी याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले. दोघांना सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढले, परंतु तिसर्‍या युवकाला पाण्याबाहेर आणताना मयुरचा दम तुटला आणि तो स्वतः पाण्यात बुडाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

मयूरला त्याच्या मित्रांनी रुग्णालयात आणले. वैद्यकीय उपचारापूर्वीच मयूरचा मृत्यू झाला होता. जिल्हा प्रशासनाने करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विकेंड लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यासंदर्भात गर्दीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ग्रामसेवक व तलाठी यांच्यावर आहे. असे असले तरी विकेंडला पर्यटनस्थळी गर्दी दिसते आहे. परंतु प्रशासकीय पातळीवर त्याचे नियंत्रण होताना दिसत नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या