Saturday, April 27, 2024
Homeनगरविळद, देहरे परिसरात बिबट्याचा वावर

विळद, देहरे परिसरात बिबट्याचा वावर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तालुक्यातील देहरे टोल नाका (Dehre Toll Naka) भागात पांढरी वस्ती तसेच काळे व कपाले वस्ती भागात चार पाच दिवसांपासून बिबट्याचा (Leopard) वावर आहे. शेतकरी जुनेद खान यांनी व्याघ्र संरक्षण समिती सदस्य मंदार साबळे यांना माहिती दिली. साबळे यांनी परिसराची पाहणी करून बिबट्याच्या (Leopard) अस्तित्वाविषयी दुजोरा दिला.

- Advertisement -

जिल्हा उपवनसंरक्षक सुवर्णा माने व वनपरिक्षेत्र अधिकारी एन. एस. जगताप यांची भेट घेऊन याबाबत चर्चा (Discussion) केली. तसेच वनरक्षक सुनीता काळे यांच्यासोबत जाऊन या परिसराची पाहणी केली. विळद (Vilad) व देहरे (Dehare) परिसरात अनेक वर्षांपासून बिबट्याचा (Leopard) वावर आहे. मात्र त्यांच्याकडून मानवास कोणताही उपद्रव झालेला नाही. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी घाबरून न जाता सायंकाळनंतर शेतात जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ऊसतोड (Sugarcane) करताना विशेष काळजी घ्यावी. पिले आढळून आल्यास त्यांना न हाताळता हा परिसर निर्मनुष्य करून तत्काळ वन विभागास माहिती द्यावी, असे आवाहन उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या