Monday, April 29, 2024
Homeनगरशिवसेनेतील छुप्या विखे-पिचड समर्थकांची हकालपट्टी करा- कतारी

शिवसेनेतील छुप्या विखे-पिचड समर्थकांची हकालपट्टी करा- कतारी

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

भाजपाच्या विरोधी उघड भूमिका न घेणार्‍या व विखे, पिचड अशा नेत्यांना दैवत मानणार्‍या, पक्षापेक्षा व्यक्तींना मानणार्‍या शिवसेनेतील छुप्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कतारी यांनी केली आहे.

- Advertisement -

याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांना पाठविलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सध्या शिवसेना मोठ्या संकटातून, फंद फितुरीतून पुन्हा नव्या जोमाने उभी राहत असताना नगर जिल्ह्यातील शिवसेनेत देखील वेळीच संघटनात्मक बदल होणे गरजेचे आहे. पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार महाविकास आघाडी सरकार झाल्यानंतर जिल्हा शिवसेनेत केवळ फायद्यासाठी बसलेल्या अनेक विखे व भाजप समर्थकांचा चेहरा खर्‍या अर्थाने दिसून आला. शिवसेनेत राहून पक्षाला काहीही फायदा नसलेल्या अशा कार्यकर्त्यांना बाहेरचा रस्ता दाखवणे गरजेचे आहे.

संगमनेर तालुका, शहरासह उत्तर नगर जिल्ह्यात असे अनेक छुपे भाजप समर्थक पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. पक्षासाठी आम्ही नेहमीच रस्त्यावर उतरून आंदोलने, मोर्चे केले, गद्दारी करणार्‍या नेत्यांना भर रस्त्यात ठोकले, त्यावेळी पक्षाच्या विरोधात असलेल्या काँग्रेस पक्ष, मंत्री थोरात यांच्या विरोधात देखील आवाज उठवला मात्र पक्षाचा आदेश आल्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साथ देणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत मैत्री केली. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी पक्षाला दावणीला लावणार्‍या अशा लोकांमुळे शिवसेना संघटनेचे मोठे नुकसान होत असून निष्ठावंत शिवसैनिक दुर्लक्षित केले जात आहेत.

पक्षातील गद्दारांचा तात्काळ सोक्षमोक्ष लागावा अशी अपेक्षा आहे. पक्ष संघटनेत कोणतेही योगदान नसणारे परंतु पक्षाचे वरिष्ठ नेते आल्यावर लुडबुड करणारे व नेहमी शिवसेनेचा द्वेष करणार्‍या भाजपाला कसा फायदा होईल अशा पद्धतीची वागणूक असणारे वा स्वत:च्या भूमिकेला पक्षाच्या भूमिकेपेक्षा जास्त महत्त्व देणार्‍या तसेच सोशल मीडिया व फेसबुक व्हॉट्सअ‍ॅपवर शिवसेना विरोधी वक्तव्य करणार्‍यांचं समर्थन करणार्‍या, शिवसेनेतील फुटीरवाद्यांवर, गद्दारांवर त्वरीत हकालपट्टीची व पदमुक्तची कारवाई करावी, असे श्री. कतारी यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या