Friday, April 26, 2024
Homeनाशिकमाडसांगवी येथे 'विकेल ते पिकेल' कार्यशाळा संपन्न

माडसांगवी येथे ‘विकेल ते पिकेल’ कार्यशाळा संपन्न

नाशिक l Nashik

माडसांगवी येथे कृषी विभागाच्यावतीने ग्राम संस्कार केंद्रात “विकेल ते पिकेल” या योजनेअंतर्गत द्राक्ष या पिकाची शेतीशाळा पार पडली. या शेतीशाळेत माडसांगवी व विंचूर गवळी येथील ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला.

- Advertisement -

कृषी संशोधन केंद्र पिंपळगाव बसवंत येथील शास्त्रज्ञ डॉ. राकेश सोनवणे यांनी द्राक्ष पिकाचे नियोजन तसेच त्यावरील विविध रोग, रोग व कीड त्यावरील उपाय योजना, याबद्दल माहिती सांगितली.

त्याचप्रमाणे विंचूर गवळी येथील प्रगतशील शेतकरी योगेश रिकामे यांनी फळमाशीचा उद्रेक व त्यावरील उपाय योजना तिचे नियंत्रण याबद्दल अनुभव कथन केले. व जैविक पद्धतीचा तसेच ट्रँप (सापळे) लावून फळ माशीचे नियंत्रण कसे करता येईल व खर्चात बचत कशी होईल याबद्दल सुचविले.

सदर शेती शाळेत कोर्टेवा अँग्रोच्या NGO गीताराणी यांनी फवारणी करताना घ्यावयाची काळजी या बद्दल माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका कृषी अधिकारी आर.डी .वाघ यांनी या योजनेची माहिती सांगून केंद्र सरकारच्या स्मार्ट प्रकल्पाचे महत्त्व व फॉर्म भरण्याची पद्धती समजावून सांगितली.

या शेती शाळेच्या आयोजनात मंडल क्रुषी अधिकारी एस. पी. चौधरी, माडसांगवी कृषी सहाय्यक आर बी गवळी, विंचूर गवळी कृषी सहाय्यक जी. जी. जमदाडे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक कल्पना पाटील यांनी सहभाग नोंदविला.

शेती शाळेच्या शेवटी शिवार फेरी काढून इतर शेतकऱ्यांना देखील सदर कार्यक्रमाची माहिती करून देण्यात आली. येथील प्रगतशिल शेतकरी संतु कहांडळ यांच्या द्राक्ष बागेत औषध फवारणी प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. कार्यक्रमासाठी माडसांगवी आणि विंचुरगवळी परिसरातील शेकडो द्राक्ष बागायतदार उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या