Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशकुख्यात गुंड विकास दुबे याला उज्जैन मधून अटक

कुख्यात गुंड विकास दुबे याला उज्जैन मधून अटक

मुंबई : Mumbai

कानपूर मध्ये आठ पोलिसांची हत्या करण्याचा आरोप असलेला कुख्यात गुंड विकास दुबे याला बेड्या ठोकण्यात यश आलं आहे. मध्य प्रदेशच्या उज्जेन मध्ये विकास दुबे याला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान काही दिवसांपूर्वी फरिदाबाद येथील एका मिठाईच्या दुकानासमोरच्या फुटपाथवर विकास दुबे उभा असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले होते. या ठिकाणाहून रिक्षाने तो पुढे कुठे गेला हे मात्र समजू शकले नाही.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये पोलीस पथकावर झालेल्या अंदाधुंद गोळीबारात उपअधीक्षकासह आठ पोलिसांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. कानपूर येथे पोलीस विकास दुबे या गुंडाला अटक करण्यास गेले असता ही चकमक उडाली होती. तेव्हापासूनच पोलीस विकास दुबेचा शोध घेत होते.

पोलिसांनी त्याच्यावर पाच लाखांचे बक्षिसही जाहीर केल होते. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून कुख्यात गुंड विकास दुबेला मध्य प्रदेशच्या उज्जैनमधून अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या