Friday, April 26, 2024
Homeनाशिकभारत मातेचा जयजयकार करत देवळालीत विजयी मशालचे स्वागत

भारत मातेचा जयजयकार करत देवळालीत विजयी मशालचे स्वागत

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

देशभरात सुवर्ण महोत्सव (golden jubilee) निमित्ताने विजयी मशालचे (Vijayi Mashal) स्वागत होत आहे. नाशिकमधील देवळाली कॅम्प (Deolali Camp) भागात वडनेर रोड मार्गे त्रिमूर्ती चौक-पोलीस स्टेशन मार्गे लष्कराच्या छावणीमध्ये जाताना पोलीस (Police) ठाण्याच्या वतीने विजयी मशालचे जोरदार स्वागत करण्यात आले…

- Advertisement -

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव, सपोनी राहुल मोरे, आलूदिन शेख, सुभाष पानसरे, पंढरीनाथ आहेर,पोलीस हवालदार मेहबूब सय्यद, जयवंत गुळवे,पोलीस नाईक पंढरीनाथ आहेर, चंद्रभान भोईर, भाऊराव गिरहे, रंजित शिवदे, राकेश रसाळ, शामराव आहेर, जालिंदर भांगर, अशोक वाजे, दत्तू गंधे, मनोहर सोळुंके, सुनील वायकंडे, प्रशांत सांगळे, नंदलाल देशमुख, महिला पोलीस लक्ष्मी जाधव आदींनी स्वागत करीत चोख बंदोबस्त ठेवला.

स्कूल ऑफ आर्टिलरीत शहिदांना सलामी

विजयी मशाल स्कूल ऑफ आर्टिलरी येथे आली असता तिचे जोरदार स्वागत करताना विविध ठिकाणी लष्करी कामगिरीवर शहीद झालेल्या वीरांना सलामी देण्यात आली. येथील तोपची फायरिंग रेंजमध्ये विजयी मशालच्या तुकडीचे प्रमुख राजस्थानातील अलवर येथील सतराजाट रेजिमेंचे कॅप्टन डिका यांच्याकडून स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल आर. के. शर्मा यांनी विजयी मशाल स्वीकारली.

फायरिंग रेंजमध्ये दर्शनी भागात मध्यावर ज्योतची स्थापना केली. भारतीय सेना दलाचे बलस्थान असणाऱ्या विविध प्रकारच्या तोफांच्या समोरून संचलन करीत प्रत्येक तोफेवर कामगिरी करणाऱ्या जवानानी विजयी ज्योतीला सलामी दिली. भारतीय सैन्य दलात युद्धाचा देव अर्थात गॉड ऑफ वॉर म्हणून तोफखान्याला संबोधले जाते. विजयी मशालीला सलामी देण्याचा मान मिळालेल्या विविध तोफांवरील सैनिकांसाठी आणि संपूर्ण भारतीय सैन्य दलासाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला आहे. विजयी मशालची तोपची रेंज येथे स्थापना झाल्यानंतर तीन प्यारा ग्लायडरने आकाशातून पुष्पवृष्टी करण्यात आली.

भारत मातेचा जयजयकार

उमराव स्क्वेअर येथे 1971 व सध्या सेवानिवृत्त असलेल्या वीरांच्या उपस्थितीत लेफ्टनंट जनरल आर के शर्मा यांनी या तुकड्यांच्या मशालीचे स्वागत केले. यावेळी सलामी, मानवंदना व लष्करी बँडच्या तालावर झालेल्या राष्ट्रगीताने वातावरण चैतन्यादाई बनले होते. नंतर विजयी मशाल ज्योत आर्मी पब्लिक स्कूलच्या गटाकडे व त्यानंतर स्कूल ऑफ आर्टिलरीच्या विविध सैनिकांच्या युनिटकडे हस्तांतरित करण्यात आली. यावेळी सैनिक व नागरिकांनी भारत ‘माता की जय’ चा जयजयकार केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या