Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यासरकारकडून शेतकऱ्यांची घोर फसवणूक; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप

सरकारकडून शेतकऱ्यांची घोर फसवणूक; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप

मुंबई | प्रतिनिधी

नैसर्गिक आपत्ती, पिकावरील रोग, बोगस बियाणे, वाढलेला उत्पादन खर्च, हवामान बदल यामुळे शेतकरी संकटात असताना कापूस, सोयाबीनची हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी सुरू आहे. सरकारने शेतकऱ्यांची केलेली ही घोर फसवणूक आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी केला. सरकारने हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

- Advertisement -

नैसर्गिक आपत्तीमुळे अगोदरच शेतकरी आर्थिक विवंचनेत असताना सरकारकडून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले आहे. शेतमालाला हमी भावापेक्षा कमी दर आहे. सरकारच्या या फसव्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे जगणे असह्य झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचे कसे?असा सवाल करत कापसाचा दर्जा चांगला असताना ५ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची खरेदी केली जात आहे.

Israel-Hamas War : नागरिकांची कत्तल करणारा हमासचा कमांडर ठार, दहशतवादी संघटनेचं मुख्यालय उद्ध्वस्त

केंद्र सरकारने कापसाला २०२३-२४ या हंगामात मध्यम धाग्यासाठी ६ हजार ६२० आणि लांब धाग्याला ७ हजार२० रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव जाहीर केला. परंतु, तो कागदावरच राहिला आहे. सध्या हमी भावापेक्षा १२०० ते १६०० रुपये कमी दराने शेतकऱ्यांकडून कापूस घेतला जात आहे.

सोयाबीनची आधारभूत किमत प्रति क्विंटल ४ हजार ६०० रुपये आहे. पण आज आधारभूत किमतीपेक्षा ५०० ते ७०० रुपये कमी दर सोयाबीनला मिळत आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक सरकारने थांबवावी. अन्यथा शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची निवडणुकीआधी राज्यात ‘या’ पक्षांसोबत युती; भाजपवरही साधला निशाणा

मराठवाड्यातील ५५ हजार हेक्टर क्षेत्राला गोगलगाईंचा फटका बसला असून या नव्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्या पाहिजेत. खरीपाबरोबर फळबागांनाही गोगलगाईंचा प्रादुर्भाव होत आहे. हा प्रादुर्भावर रोखण्यात सरकारला अपयश आले असून सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका करत संकटात असलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ठोस मदत देण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या