विद्या बालनचा ‘नटखट’ ऑस्करच्या शर्यतीत

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई – Mumbai

अभिनेत्री विद्या बालनच्या ‘नटखट’ या लघुपटाची सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवल्या जाणार्‍या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदा वर्णी लागली आहे.

‘नटखट’ची निवड 2021 च्या ऑस्करमध्ये करण्यात आली आहे. याविषयीची माहिती त्यांच्या टिवटरवर एक पोस्ट शेअर करत दिली. ऑस्कर 2021 मध्ये विद्या बालनची मुख्य भूमिका असलेला ‘नटखट’ या लघुपटाला शॉर्ट फिल्म कॅटेगरीत नामांकन मिळाले.

अनेक घडामोडी मागील एका वर्षामध्ये घडल्या. पण आमच्या शॉर्ट फिल्मची या काळात ऑॅस्करसाठी निवड करण्यात आली ही खुपच फार छान गोष्ट घडली. ही लघुकथा मला अत्यंत जवळची आहे. लघुपटामुळे मला कलाकार आणि निर्माता अशा दुहेरी भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याचे विद्या म्हणाली.

हा लघुपट सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा असून समाजात असलेली पितृसत्ताक पद्धती, लिंगभेद, बलात्कार, घरगुती हिंसा आणि महिलांसोबत असलेल्या नात्यांचे पुरुषांकडून करण्यात येणारे वर्गीकरण यासारख्या मुद्द्यांवर हा लघुपट प्रकाश टाकतो. 33 मिनिटांच्या या शॉर्ट फिल्ममध्ये विद्या महत्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे.

अनेक घडामोडी 2020 या वर्षात घडल्या. पण नटखटची घोडदौड सुरुच होती. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये नटखटचे स्क्रिनिंग करण्यात आले. तसेच वी आर वन: अ ग्लोबल फिल्म फेस्टिव्हल (2 जून 2020) मध्ये या लघुपटाचं वर्ल्ड प्रिमिअर करण्यात आले. तसेच इंडियन फिल्म फेस्टिव्हल स्टटगार्ट (15 ते 20 जुलै) या काळात स्क्रीनिंग करण्यात आले.

याप्रमाणेच जर्मन स्टार ऑफ इंडिया अ‍ॅवॉर्डदेखील मिळला. एवढेच नव्हे तर लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हल, साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हल ऑरलॅडो फ्लोरिडा फिल्म फेस्टिव्हलसाठी देखील आमंत्रित करण्यात आले होते. त्यासोबतच मेलबर्नमध्ये इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा लघुपट दाखवण्यात आला. विशेष म्हणजे नटखटने फिल्म बेस्ट ऑफ इंडिया शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे विजेतेपददेखील पटकावले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *