Friday, April 26, 2024
Homeनगरविडी कामगारांचा दुसर्‍या दिवशीही ठिय्या

विडी कामगारांचा दुसर्‍या दिवशीही ठिय्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लाल कार्डधारक (Red Card Holder) विडी कामगारांना (Vidi Workers) पुर्ववत कामे देऊन मजुरी द्यावी व इतर कामगारांना रोख बोनस (Bonus) देण्याच्या मागणीसाठी शहरातील ठाकुर सावदेकर विडी कारखान्याच्या (Vidi Factories) बागडपट्टी शाखेसमोर लालबावटा विडी कामगार युनियनच्या आयटक व इंटकच्या वतीने दुसर्‍या दिवशीही ठिय्या आंदोलन करुन निदर्शने करण्यात आली.

- Advertisement -

दिवाळीच्या तोंडावर विडी कामगारांचा प्रश्न (Vidi Workers Question) न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा (Hint) संघटनेच्या वतीने देण्यात आला. यावेळी आयटकचे जिल्हा सचिव अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, विडी कामगार युनियनच्या उपाध्यक्षा कॉ. भारती न्यालपेल्ली, सतीश पवार, कमल दोंता, सरोजिनी दिकोंडा, निर्मला न्यालपेल्ली, कविता मच्चा, लिलाबाई भारताल, शोभा पासकंटी, लक्ष्मीबाई कोटा आदींसह शहरातील विडी कामगार महिला उपस्थित होत्या. सकारात्मक निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या