लोकशाही दिनाचे आयोजन

jalgaon-digital
1 Min Read

जळगाव – Jalgaon

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तथापि, सद्यस्थितीत संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे.

सदरहू विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीमध्ये तालुका, जिल्हाधिकारी, महानगरपालिका व विभागीय आयुक्त स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन दुरचित्रवाणी परिषदेव्दारे (video Conferncing) करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.

त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व नागरिकांकरिता दुरचित्रवाणी परिषदेव्दारे (Video Conferncing) दिनांक 7 डिसेंबर, 2020 रोजी सकाळी 11 वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

तरी नागरिकांनी संबंधित तहसिल कार्यालयात वेळेवर उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडाव्यात. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *