Wednesday, April 24, 2024
HomeनगरVIDEO : शेतातील २५ एकर ऊस जळाला

VIDEO : शेतातील २५ एकर ऊस जळाला

आरडगांव l वार्ताहर

राहुरी तालुक्यातील माहेगाव शिवारामध्ये अचानक ऊसाला आग लागल्याने सुमारे २५ एकर ऊस जळाला आहे. तर ग्राम सुरक्षा यंत्रणा आणि ग्रामस्थांच्या तत्परतेने हे आग आटोक्यात आणण्यात आल्याने सुमारे परिसरातील दीडशे एकर ऊस क्षेत्र हे जळीत होण्यापासून वाचले आहे.

- Advertisement -

माहेगाव (ता.राहुरी) येथील पुंजाहरी मुंगसे, भाऊसाहेब पवार या शेतक-यांच्या ऊसाला सोमवारी दुपारच्या दरम्यान अचानक आग लागली. या आगीत सुमारे २५ एकर उस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलीस पंकज आढाव यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबरवरून ही माहिती संपूर्ण गावाला कळवली.

काही वेळातच गावातील सुमारे शेकडो गावकरी मदतीसाठी धावले व उसाला लागलेली आग ग्रामस्थांच्या मदतीने विझवण्यात यश आले. त्यामुळे परिसरातील सुमारे १५० एकर ऊस वाचविण्यात यश आले. सदर आग का लागली हे माञ उशीरापर्यंत समजू शकले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या