Friday, April 26, 2024
HomeनाशिकVideo : सिडको परिसरात टवाळखोरांकडून वाहनांची तोडफोड

Video : सिडको परिसरात टवाळखोरांकडून वाहनांची तोडफोड

नाशिक | Nashik

शहरातील जुने सिडको परिसरामध्ये (Old Cidco Area) दोन दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या काही तरुणांनी (Youth) एका भाजी विक्रेत्याची हत्या (Murder) केल्याची घटना घडली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते…

- Advertisement -

Video : पिंपळगाव बसवंतला एटीएम फोडून लाखोंची रोकड लंपास

या घटनेला काही तास उलटत नाही तोवर पुन्हा एकदा त्याच परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही टवाळखोरांनी हैदोस घालत अनेक वाहनांची तोडफोड (Vandalism of Vehicles) केल्याची घटना घडली आहे. या परिसरात सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे पोलिसांसमोर (Police) मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Maharashtra Rain Update : राज्यात ‘या’ दोन आठवड्यात मुसळधार पाऊस कोसळणार; हवामान विभागाचा अंदाज

याबाबत अधिक माहिती अशी की, जुने सिडकोतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, अचानक चौक, साईबाबा मंदिर मागील बाजू येथे अज्ञात टवाळखोरांनी १० ते १२ वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत (Terror) माजविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे आणि नाराजीचे वातावरण पसरले आहे.

‘शिवशक्ती’ अन् ‘तिरंगा’! चंद्रावरील ‘त्या’ २ ठिकाणांना PM मोदींनी दिली नावं

दरम्यान, या घटनेची पोलिसांनी (Police) गंभीर दखल घेतली असून तातडीने परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) ताब्यात घेतले असून त्यात ४ जणांच्या टोळक्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस (Ambad Police) करत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

आमदार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नव्हे! शरद पवारांनी अजित दादांना ठणकावले

- Advertisment -

ताज्या बातम्या