Friday, April 26, 2024
Homeधुळेदोन वाहनांना आग; दोघांचा होरपळून मृत्यू

दोन वाहनांना आग; दोघांचा होरपळून मृत्यू

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

मुंबई-आग्रा महामार्गावर नगावनजीक पहाटे रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या नादुरुस्त कंटेनरला

- Advertisement -

दुधाच्या टँकरने मागून धडक दिली. त्यानंतर दोन्ही वाहने जळाली. यात दोन जण होरपळून मयत झाले. त्यांची ओळख पटलेली नाही.

महामार्गावरुन इंदूरकडे जाणारे कंटेनर (क्र. एनएल 01 एसी 4843) हे नगाव गावानजीक नादुरुस्त झाले होते. त्यामुळे पहाटे 3.30 वाजता अंधारात कंटेनरचा टायर चालक बदवलत होता.

त्यावेळी धुळ्याकडून शिरपूरकडे दुधाचा टँकर (क्र. एमएच 12 एलटी 3609) जात असतांना टँकरने कंटेनरला धडक दिली.

अपघात झाल्यानंतर टँकरच्या कॅबीनमध्ये शार्टसर्किट होवून आग लागली. या आगीची झळ कंटेनरलाही बसली. महापालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. यात दोन जण होरपळून मयत झाले.

महामार्गावर दोन वाहने जळाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करण्यात आली. त्यानंतर वाहतून सुरळीत झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या