Tuesday, April 23, 2024
Homeनगरवैजापूर, शिल्लेगाव व बीड येथून गाड्या चोरणारी टोळी जेरबंद

वैजापूर, शिल्लेगाव व बीड येथून गाड्या चोरणारी टोळी जेरबंद

वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur

वाहन चोरी (Vehicle Theft) करणारी आंतर जिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) जेरबंद (Gang Arrested) केली. शिर्डीतून (Shirdi) आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याचे साथीदार जालन्यातून पकडण्यात आले. जालन्यातील (Jalana) साथीदारांने लपवून ठेवलेल्या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. टोळीतील म्होरक्यावर तब्बल 42 चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या टोळीकडून 8 लाख 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी संतोष उर्फे गणेश शंकर शिंदे (रा. कालीकानगर, शिर्डी, ता. राहता), साईनाथ रघुनाथ कचरे (रा. साईनगर शिर्डी, ता. राहता), परमेश्वर भीमराव अंभोरे (रा. चंदनझिरा, जालना) यांना अटक (Arrested) करण्यात आली आहे.

- Advertisement -

दि. 24 ऑक्टोबर 2013 रोजी गणेश भीमराव गाडे (वय 45, रा. लासूरगाव रोड) यांनी त्यांची फोर्स क्रुझर जिप (क्र.एमएच. 20 डिव्ही. 0062) ही त्यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत शिल्लेगाव पोलीस ठाण्यात (Shillegav Police Station) तक्रार दिली होती. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गाड्या चोरीच्या गुन्हयांचा शिल्लेगाव पोलीस ठाणे यांच्या सोबत स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करित असताना पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांना शिर्डी (Shirdi) येथील संतोष उर्फ गणेश शंकर शिंदे याने हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली.

त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डी येथे जावून कालीकानगर परिसरात सापळा लावला. तेथे संशयित संतोष उर्फे गणेश शंकर शिंदे हा फिरताना आढळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी विचारणा केली असता त्याने ती गाडी ही त्याचे साथीदार साईनाथ रघुनाथ कचरे व परमेश्वर भीमराव अंभोरे यांच्या साथीने चोरी केली असून ती जालना येथे लपवून ठेवल्याची कबुली दिली.

त्यावरून शिर्डी (Shirdi) येथून साईनाथ रघुनाथ कचरे यास तर जालना येथील चंदिनझिरा परिसरात तिसरा आरोपी परमेश्वर भीमराव अंभोरे यास ताब्यात घेतले. गाडीबाबत विचारपूस केल्यानंतर त्याने चोरी केलेली गाडी जालना (Jalana) येथील भवानीनगर परिसरात लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यावरून भवानीनगर परिसराची पोलिसांनी पाहणी केली असता तेथे या टोळीने चोरी केलेल्या 3 गाड्या ज्यात 2 क्रुझर जीप व 1 लोडींग पिकअप असा एकूण किंमत 8 लाख 10 हजारांचा मुद्देमाल मिळून आला. घटनेचा पुढील तपास शिल्लेगाव पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या