Saturday, May 11, 2024
Homeदेश विदेशऑगस्टमध्ये चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या विक्रीत वाढ

ऑगस्टमध्ये चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या विक्रीत वाढ

नवी दिल्ली

देशात सणांचा मोसम सुरू होत असून, याचा सकारात्मक परिणाम वाहन क्षेत्रावर झाला आहे. ऑगस्टमध्ये चारचाकी वाहनांच्या

- Advertisement -

घाऊक विक्रीत 14 टक्के वाढ होऊन या कालावधीत 2.15 लाख वाहनांची विक्री झाली. मागील वर्षी समान कालावधीत 1.9 लाख वाहनांची विक्री झाली होती, अशी माहिती इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्सने (सियाम) दिली आहे.

सलग नऊ महिने चारचाकी वाहनांच्या विक्रीत घसरण झाल्यानंतर ऑगस्टमध्ये या विक्रीत सकारात्मक बदल दिसून आले आहेत. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये चारचाकी वाहनांच्या विक्रीत वृद्धी दिसून आली होती. त्यानंतर सलग नऊ महिने विक्रीमध्ये घसरण झाली होती.

दुचाकी वाहनांची विक्री देखील वाढल्याचे सियामच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. ऑगस्टमध्ये दुचाकी वाहनांच्या विक्रीत 3 टक्के वाढ होऊन 15.6 लाख वाहने या कालावधीत विकली गेली. मागील वर्षी समान कालावधीत 15.1 लाख वाहनांची विक्री झाली होती. ऑगस्टमध्ये झालेल्या दुचाकींच्या विक्रीत 10.3 लाख मोटारसायकलींचा समावेश होता. मागील वर्षी याच कालावधीत 9.4 लाख मोटारसायकली विकल्या गेल्या होत्या.

मागील वर्षी ऑगस्टमध्ये स्कूटर्सची विक्री 10 टक्क्यांनी वाढली होती. ऑगस्ट 2018 मध्ये 5.2 लाख स्कूटर्सची विक्री करण्यात आली होती, असे सियामने म्हटले आहे. मागील महिन्यात तीनचाकी वाहनांच्या विक्रीत मात्र 75 टक्के घट होऊन 14,534 वाहनांची विक्री झाली. ऑगस्ट 2019 मध्ये 58,818 तीनचाकी वाहनांची विक्री झाली होती.

वाहनांच्या विक्रीत आता वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहन क्षेत्राला आत्मविश्वास मिळण्यास मदत होईल. विशेषतः चारचाकी आणि दुचाकी वाहन क्षेत्रासाठी ही दिलासादायक बाब आहे, असे सियामचे अध्यक्ष आणि मारुती सुझुकीचे व्यवस्थापकीय संचालक केनिची आयुकावा यांनी सांगितले.

2018 च्या तुलनेत 2019 मध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत 32 टक्के आणि दुचाकींमध्ये 22 टक्के नकारात्मक वृद्धी नोंदवण्यात आली होती. त्यामुळे ऑगस्टमध्ये नोंदविण्यात आलेली आधारभूत आकडेवारी ही देखील अतिशय कमी आहे, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या