Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारवाहनधारकाला रस्त्यात अडवून मारहाण

वाहनधारकाला रस्त्यात अडवून मारहाण

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

जुन्या वादाची कुरापत काढून वाहनधारकाला रस्त्यात थांबवून मारहाण करुन गळयातील 3 तोळे सोन्याची

- Advertisement -

माळ काढून घेतल्याप्रकरणी दोघांविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वादाची कुरापत काढून अशोक वेस्ता तडवी व वन्या वेस्ता तडवी (दोन्ही रा.वेली) यांनी नितेश रायसिंग वळवी (रा.वेलीचा सोरापाडा ता.अक्कलकुवा) हा त्याच्या स्विफ्ट कारने जात असतांना त्याला अडवून जबर मारहाण केली.

तसेच गळयातील तीन तोळयाची सोन्याची चेन काढून घेतली. ही घटना अक्कलकुवा तालुक्यातील साखली उमर ते वेली रस्त्यावर मोखागव्हाण फाटयाजवळ घडली.

याबाबत नितेश वळवी याने दिलेल्या फिर्यादीनुसार मोलगी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या