Wednesday, April 24, 2024
Homeनगरवाहनाच्या धडकेत बछड्याचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत बछड्याचा मृत्यू

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर- साकूर रस्त्यालगत अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ही घटना उजेडात आली. याबाबतची माहिती देणार्‍या नागरिकांना वनविभागाच्या कर्मचार्‍याने आरेरावी केल्याने या नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

बुधवारी सकाळी शिबलापूर – साकूर रस्त्यावरील शिबलापूर शिवारातील जिजाबा नागरे यांच्या शेतजमीनीलगत बिबट्याचे बछडे झोपलेल्या अवस्थेत दिसले. त्यामुळे नागरिकांनी थोडे जवळ जाऊन पाहिले असता त्याच्या तोंडातून रक्त येऊन पिल्लू मृत झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी वनविभागाचा नंबर मिळवून वनविभागाला घटनेची माहिती दिली. अज्ञात वाहनाच्या धडकतेत बिछडा मृत पावल्याची घटना घडल्याची माहिती मिळाल्यामुळे घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे काही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी माहिती देणार्‍या नागरिकांनाच या मुजोर कर्मचार्‍याने आरेरावी केली. नागरिकांनी या मुजोर कर्मचार्‍याच्या वागणूकीबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान या मृत बछड्याला वनविभागाचे कर्मचारी आपल्या समवेत घेऊन गेले.

शिबलापूर, पानोडी, आश्वी, उंबरी बाळापूर, पिप्रीं आदींसह प्रवरा नदी तिरावरील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यासह तरसाची मोठी दहशत आहे. वनविभागकडून नागरिकांच्या हिताच्या कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही. वनविभाग कर्मचार्‍याचे संपर्क क्रमांक नागरिकांकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे नागरीक नेहमी संपर्कात असलेल्या पदाधिकारी अथवा पत्रकारांना घटनेची माहिती देत असतात. याचाचं राग मनात बाळगून वनविभागाचे कर्मचारी हे माहिती देणार्‍यासह उपस्थित नागरिकांना आरेरावी करण्याच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी या कर्मचार्‍यांना योग्य ती समज द्यावी अशी मागणी नागरिकांकडूद केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या