Friday, April 26, 2024
Homeनगरभाजीपाला विक्रेत्यांनी पुन्हा बसविले बस्तान

भाजीपाला विक्रेत्यांनी पुन्हा बसविले बस्तान

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरात भाजीपाला विक्रेत्यांनी भाजीमंडई व आठवडे बाजार सोडून कॅनालच्या कडेला रस्त्यावरच भाजीपाला भरविण्यास सुरुवात केली आहे. अशा भाजीपाला विक्रीला नागरिकांनी विरोध केला होता. त्यानुसार पालिकेने कारवाईही केली. परंतु दुसर्‍या दिवसापासून पुन्हा या कॅनालच्या कडेला भाजीपाला विक्रेत्यांनी आपले बस्तान बसविले आहे. त्यामुळे या परिसरात व्यवसाय करणारे व राहणार्‍या नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे पालिकेने या भाजीपाला विक्रेत्यांविरुध्द तातडीने कारवाई सुरु ठेवावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

- Advertisement -

गेल्या पावणेदोन वर्षापासून करोना महामारीने संपूर्ण जगाला विळखा घातला होता. त्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांनी मिळेल त्या जागेवर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. जागा चांगली आहे म्हणून कॅनालच्या कडेला कायमस्वरुपी बस्तान या भाजीपाला विक्रेत्यांनी बसविले. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा ठरत असून या मार्गावर मोठेमोठी रुग्णालये आहेत, शाळा आहेत. त्यामुळे अतिगंभीर रुग्णांना या रुग्णालयात आणणे अथवा दुसर्‍या रुग्णालयात नेणे खूपच कसरतीचे होवून जाते. रस्तावरील गर्दीमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प होते. त्यामुळे या परिसरात असलेले व्यावसायिक व नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मागील आठवड्यात नगरपालिकेने कॅनालच्या कडेला बसलेल्या भाजीपाला विक्रेत्यांविरुध्द कारवाई सुरु केली होती. भाजीपाला विक्रेतेही दोन दिवस या ठिकाणी बसले नाहीत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून या भाजीपाला विके्रेत्यांनी पुन्हा आपले बस्तान कॅनालच्या लगत रस्त्यावर बसविले आहे.

तरी पुन्हा नगरपालिकेने आपली कारवाई कायमस्वरुपी ठेवावी. या ठिकाणी भाजीपाला विक्रेते बसणारच नाहीत अशी व्यवस्था करावी. किंवा त्यांंना मोठ्या प्रमाणावर दंड आकारला जावा त्यामुळे भाजीपाला विके्रेते आपापल्या जागेवर जावून भाजीपाला विक्री करु शकतील. तरी पालिकेने या भाजीपाला विक्रेत्यांना या ठिकाणी भाजीपाला विक्री करण्यास बंदी घालावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या