Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedपालेभाज्याच्या दरात घसरण; शेतकरी चिंतेत

पालेभाज्याच्या दरात घसरण; शेतकरी चिंतेत

नाशिक | सुधाकर शिंदे

नाशिक मार्केेट कमेटीत गेल्या काही दिवसात पालेभाज्यांची प्रचंढ आवक झाली असल्याने पालेभाज्या जुडी शेकडा दर शंभर ते दीडशे रुपयावर आले आहे. जिल्ह्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात पालेभाज्या आल्याने कवडीमोल भावात भाज्या विकाव्या लागत आहे. यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे….

- Advertisement -

नाशिक मार्केट कमेटीत गेल्या आठवड्यापासुन पालेभाच्यांची आवक लक्षणिय वाढली असुन परिणामी भावात मोठी घसरण झाली आहे.

मागील महिन्यात कोथंबीर, मेथी, शेपू, पालक, कांदा पात, मुळा यांची आवक कमी होती. लागवड कमी असल्याने माल कमी आल्यामुळे मागील महिन्यात १५०० ते ३००० रुपये शेकडा या भावाने पालेभाज्या विकल्या जात होत्या.

आता मात्र दिवाळीनंतर अचानक पालेभाज्यांची अचानक वाढ झाली आहे. ही आवक मोंठ्या प्रमाणात झाल्याने भावात मोठी घसरण झाली आहे. आता शेतकर्‍यांना शेकडा १०० ते १५० रुपये भावाने आपल्या पालेभाज्या लिलावात विकाव्या लागत आहे.

यामुळे शेतकर्‍यांच्या पदरात मोठी निराशा पडत आहे. भाव पडल्याने काही शेतकर्‍यांना पालेभाज्या मार्केट आणणे परवडत नसल्याने शेतात जनावरे सोडून द्यावे लागत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या