कडक लॉकडाऊन : बाजारसमित्या, भाजीमार्केट पूर्णपणे बंद; अशी करा मालाची विक्री

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी

येत्या बुधवार (दि १२) पासून कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हयातील सर्व कृषी उत्पनबाजार समित्या बंद राहतील.

याकाळात शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री करण्याच्या दृष्टीने पर्यायी व्यवस्था विकेंद्रित पद्धतीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीची राहील. याबाबत समन्वयाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांची राहील.

या कालावधीत जिल्हयातील सर्व भाजी मार्केट आणि आठवडी बाजार बंद राहतील. भाजी मार्केट पूर्णतः बंद ठेवून रस्त्याच्या कडेला सुरक्षित अंतरावर आखणी करून देऊन सकाळी 07.00 ते 12.00 या वेळात भाजी, फळे विक्री करण्यासाठी जागा निश्चित करून देण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची राहील.

फिरत्या हातगाडी वरून वरील वेळेतच भाजीपाला व फळे विक्री करणेस परवानगी राहील असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यामुळे मालाची उपलब्धता होणार नसल्याने येत्या दहा दिवसांत भाज्यांचे दरातदेखील चढउतार बघावयास मिळणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *