Friday, April 26, 2024
Homeनगरभाजीपाला बाजारात गर्दी वाढली; करोना वाढण्याची भिती

भाजीपाला बाजारात गर्दी वाढली; करोना वाढण्याची भिती

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर (Shrirampur) शहरातील भाजीपाला बाजारात (vegetable market) मोठ्या प्रमाणावर गर्दी (Crowd) वाढू लागली आहे. यामुळे करोना वाढण्याची (Corona Increse) शक्यता असून गर्दी वाढणार नाही याचे नियोजन करावे, अशी मागणी (Demand) पालिकेचे ज्येष्ठ नगसेवक श्रीनिवास बिहाणी यांनी केली आहे.

- Advertisement -

काही दिवसापासून करोना रुग्णांची (Corona Patient) संख्या जरी कमी झालेली दिसत असली तरी पुढे तिसर्‍या लाटेचा मोठा धोका आहे. त्यामुळे आगामी काळात कोणत्याही प्रकारची रिस्क घेणे खूपच महागात पडू शकते. दुसर्‍या लाटेत अनेकांचा मृत्यू (Death) झाला. अनेकांना या मोठ्या संकटातून जावे लागले. त्यामुळे आगामी काळातील मोठा धोका लक्षात घेता आतापासूनच नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स (Social Distance) ठेवणे, तसेच सॅनिटायझरचा वापर (Sanitizer Use) करणे या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

या भाजीपाला बाजारात गर्दी (Vegetable market Crowd) होणार नाही यासाठी पालिकेने काळजी घेणे गरजेचे आहे. याबाबतीत मुख्याधिकार्‍यांनी नियोजन करणे गरजेचे होते. मात्र सध्याच्या या काळात मुख्याधिकार्‍यांचे (CEO) पूर्णपणे दुर्लक्ष (ignore) असल्याचा आरोपही श्री. बिहाणी यांनी केला. त्यामुळे आगामी काळाचा धोका ओळखता श्रीरामपूर शहरात अशा प्रकारे करोना संसर्ग (Corona contagion) वाढू नये यासाठी गर्दी वाढण्याच्या ठिकाणी पालिकेने आपली लोक तैनात करावेत, जे नियम तोडत असतील त्यांना दंड करावेत, मुख्याधिकार्‍यांनी स्वतः रस्त्यावर फिरुन याची अंमलबजावणी होते की नाही याबाबत पहाणी करणे अशा प्रकारचे नियोजन करावे, अशी मागणीही श्री. बिहाणी यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या