Friday, April 26, 2024
Homeजळगावचाळीसगाव तालुक्यातील सुपत्राला आले वीरमरण

चाळीसगाव तालुक्यातील सुपत्राला आले वीरमरण

चाळीसगाव – जि.जळगाव Jalgaon

तालुक्यातील तांबोळे बुद्रक येथील सुपुत्र, सागर रामा धनगर यांना आज 31 जानेवारी, 2021 रोजी सेनापती (मणिपूर) येथे वीरमरण आल्याची बातमी आहे.

- Advertisement -

सागर धनगर हे नोव्हेंबर, 2017 मध्ये 5, मराठा इन्फ्रंटी बटालियनमध्ये रुजू झाले होते. वीरजवान सागर यांचे पार्थिव 1 फेब्रुवारी, 2021 रोजी दुपारी 14.10 वाजता इंम्फाळ (मणिपूर) येथून गुवाहाटी (आसाम) येथे आणण्यात येणार आहे. तेथून ते दुपारी 15.30 वाजता मुंबई येथील विमानतळावर सांयकाळी 19.15 वा. पोहचेल. व त्यांनतर ते शक्यतो मंगळवार, 2 फेब्रुवारी, 2021 रोजी त्यांच्या मुळगावी आणण्यात येईल. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. सागर यांचे बंधू अशोक धनगर यांचा संपर्क क्रमांक 8080939878 असा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या