Friday, April 26, 2024
Homeनाशिकस्वा. वीर सावरकरांचा जीवनप्रवास लेझर शोद्वारे दाखवावा : खा.राऊत

स्वा. वीर सावरकरांचा जीवनप्रवास लेझर शोद्वारे दाखवावा : खा.राऊत

देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

भगूरपुत्र स्वा.विनायक दामोदर तथा तात्याराव सावरकर यांचा जीवनप्रवास लेझर शोच्या माध्यमातून लोकांपुढे आणावा, असा मौलिक सल्ल्या शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी भगूर येथे दिला.

- Advertisement -

शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना मातृशोक झाल्याने खा. राऊत यांनी काल भगूर येथे करंजकर यांची निवासस्थानी भेट घेऊन करंजकर परिवाराचे सांत्वन केले. यावेळी भगूर नगराध्यक्ष, नगरसेवक यांचेशी चर्चा करताना खा.राऊत यांनी सावरकर स्मारक व उद्यान याबाबत माहिती जाणून घेतली.

जिल्हाप्रमुख व भगूर नगरसेवक विजय करंजकर यांनी स्मारकात देश विदेशातील सावरकरप्रेमी भेट देत असतात. तर पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या उद्यानासाठी फडणवीस सरकारने एक रुपया देखील मागील पाच वर्षात दिला नाही. मात्र महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी 6 महिन्यात 5 कोटीची मदत दिली. त्यामुळे उद्यानाचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगितले.

यावेळी खा. राऊत यांनी उद्यानात लेझर शोच्या माध्यमातून सावरकरांचा जीवनप्रवास सादर केल्यास खर्‍या अर्थाने तात्याराव सावरकर आजच्या पिढीला कळतील. याकामी दिल्ली व हैदराबाद येथील उद्यानातील लेझर शोची माहीती घेण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी नगराध्यक्षा अनिता करंजकर, रंगनाथ करंजकर, रोहीदास करंजकर व समस्त करंजकर परीवारांचे त्यांनी सांत्वन केले.

याप्रसंगी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, मनपा विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, गटनेते विलास शिंदे, महानगर प्रमुख महेश बडवे, सचिन मराठे, नगरसेवक आर.डी.धोंगडे, भागवत आरोटे, डी.जी. सूर्यवंशी, भगूर उपनगराध्यक्ष सुधेश वालझाडे, नगरसेवक दिपक बलकवडे, संजय शिंदे, उत्तर आहेर, भाऊसाहेब गायकवाड, आर.डी. साळवे, फरीद शेख, राजेंद्र मुंदडा, तानाजी भोर, चंद्रकांत गोडसे, शंकर करंजकर, प्रमोद घुमरे, पांडुरंग आंबेकर, श्याम ढगे, काका देशमुख, काका करंजकर, सिदेश गायकवाड, निवृत्ती मुठाळ, शेखर जाधव, सागर डोंगरे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या