Thursday, April 25, 2024
Homeजळगाववीर सावरकर रिक्षा युनियनच्या सभेत भाडेवाढीचा प्रस्ताव

वीर सावरकर रिक्षा युनियनच्या सभेत भाडेवाढीचा प्रस्ताव

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

गेल्या महिन्याभरापासून पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीने शंभरी पार केली आहे. त्यामुळे वीर सावरकर रिक्षा युनियनच्या सर्वसाधारण सभेत शहरात 15 ते 20 रुपये प्रती प्रवासी भाडे वाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

- Advertisement -

वीर सावरकर रिक्षा युनियची मासिक सर्वसाधारण बैठक अध्यक्ष दिलीप सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. कारोनाच्या महामारीपाठोपाठच पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडत आहे. त्यामुळे रिक्षा चालकांचे जुने भाडे दहा ते पंधरा रुपये आहे. ते आता 15 ते 20 रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

रिक्षा पासिंगसाठी सर्व गोष्टींची सक्ती केली जात आहे. त्यात मीटरमध्ये 16 रुपयांचा आकडा दिसला पाहिजे तरच, आरटीओकडे गाडीची पासिंग होईल. मीटर दुरुस्तीसाठी 16 रुपयांचा आकडा दिसण्यासाठी 1500रुपये रिक्षा चालकांना मोजावे लागणार असून, इलेक्ट्रॉनिक मीटर दुरुस्ती होत नसल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे रिक्षा चालकांना नवीन मीटर घ्यावे लागणार असून, त्यासाठी तीन हजा रुपये मोजावे लागणार आहे.

मागील पाच ते सहा वर्षांपुर्वी आरटीओ व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन शहरातील सर्व थांब्यांचे सर्वेक्षण मीटर भाडे ठरवून दिले होते. मात्र जळगाव शहरात नागरिक सीट पध्दतीने चालतात यावर आरटीओंनी पासिंगच्या वेळेस मीटरची सक्ती करु नये. या सभेप्रसंगी अशोक चौधरी, भानू मामा, एकनाथ बारी, बंटी चौधरी, शशी जाधव, विलास ठाकूर, संजय ठाकूर, जग्गू भाट, ललित कानडे, किरण मराठे, उत्तम काळे, संभाजी पाटील, नाना कोळी, मनोज भोगे, वसंत महाजन, मुरलीधर भंगाळे, राजेंद्र चौधरी, गोपाल चौधरी, रवींद्र हळदे, केशव धांडे, प्रभाकर महाजन, नरेंद्र कोलते, संजय महाजन, पोपटे ढोबळे, संजय पवार, नितीन शिंदे, अनिल चव्हाण, रवींद्र ठाकरे, गुणवंत अडकमोल, जितेंद्र देवरे, महेंद्र देवराज, अजय वाघ, विनोद पाटील, अजय सोनवणे, संदीप कुमावत, सागर दिक्षीत आदी उपस्थित होते.

इन्शुरन्स ‘फी’ कमी करावी

जुने मीटर काढून इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसविण्यास भाग पाडले आता तेच इलेक्ट्रॉनिक्स मीटर दुरुस्ती करुन आणावे अशी सक्ती केली जात आहे. त्यासाठी रिक्षा चालकास 1500 रुपये मोजावे लागत आहे. तसेच 20 ते 25 वर्षांपासून जो इन्शुरन्स काढला आहे तो आजपर्यंत थर्ड पार्टी सात हजार रुपयांपर्यंत भरावा लागत आहे. मात्र रिक्षा चालकांना इन्शुरन्स कंपनीकडून काही एक लाभ झालेला नाही. रिक्षाचा इन्शुरन्स कमी करावा. असा प्रस्ताव मांडण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या