Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रसावरकरांचा जन्मदिन ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करणार

सावरकरांचा जन्मदिन ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करणार

मुंबई | Mumbai

स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य सरकारतर्फे ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे. या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्र उन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान असून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रउन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांची देशभक्ती,धैर्य,प्रगतीशील विचारांना पुढे नेण्यासाठी, त्यामाध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती.”

देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रउन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांची देशभक्ती, धैर्य, प्रगतीशील विचारांना पुढे नेण्यासाठी, सावरकरांना अभिवादन करण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती. सामंत यांच्या मागणीनंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या