Saturday, April 27, 2024
Homeनगरवसंत बंधार्‍यावरील संरक्षक कठड्यांचे काम रेंगाळले

वसंत बंधार्‍यावरील संरक्षक कठड्यांचे काम रेंगाळले

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

गोदावरी नदीकाठच्या लाख, बापतरा, डोणगाव तसेच पुणतांबा गावासाठी दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणार्‍या गोदावरी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या वंसत बंधार्‍याच्या पुलावरील रस्त्यावर बांधण्यात येणार्‍या संरक्षक कठड्यांचे काम गेल्या दीड महिन्यापासून बंद असल्यामुळे हे काम नेमके केंव्हा सुरु होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

- Advertisement -

गेल्या 22 वर्षापासून या पुलाच्या दुतर्फा संरक्षक कठडे नसल्यामुळे बंधार्‍यावरून ये-जा करताना अपघाताचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे बंधार्‍याच्या रस्त्याची दुरुस्ती करून संरक्षक कठडे बांधावेत, अशी ग्रामस्थांची गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती. अखेर आ. आशुतोष काळे यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा करून 25 लाखाचा निधी मंजूर करून घेतला तसेच कामाची सुरुवा सुद्धा केली होती.

बंधार्‍यांच्या रस्त्याची दुरुस्ती झालेली आहे. तसेच संरक्षक कठडे बसविण्याचे काम सुरु झाले. मात्र अचानक हे काम बंद झाले होते. मध्यंतरी गोदावरी नदीला पुर आल्यामुळे काम बंद ठेवण्यात आले असावे, असा ग्रामस्थांचा अंदाज होता. आता मात्र गोदावरी नदीचे पाणी कमी घेऊन अनेक दिवस झाले तरी कामाला सुरवात न झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संरक्षक कठड्यांचे काम पूर्ण न झाल्यामुळे या पुलावरून प्रवास करणे धोकादायक आहे. त्यामुळे तातडीने कामाची सुरुवात करून ते पूर्ण करावे, अशी मागणी या पुलावरून प्रवास करणारे विद्यार्थी ग्रामस्थ यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या