Tuesday, April 23, 2024
HomeनगरVideo : वरखेड येथे हजारो भाविकांची गर्दी

Video : वरखेड येथे हजारो भाविकांची गर्दी

सलाबतपूर |वार्ताहर| Salabtpur

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) सलाबतपुर (Salabatpur) येथील महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी आज आषाढ महिन्यातल्या (Ashadh month) शेवटच्या शुक्रवारी पंधरा ते वीस हजार भाविकांची गर्दी (Crowd of devotees) झाली.

- Advertisement -

पोलीस निरीक्षक विजय करे (PI Vijay Kare) यांनी स्वतः येऊन दुकाने काढून घेण्यास व्यापाऱ्यांना बजावले. दुकाने काढून घेताना व्यापाऱ्यांची पळापळ झाली. वरखेड (Varkhed) येथे आषाढ महिन्यात भाविकांची प्रचंड गर्दी होते. यावेळी करोनामुळे मंदिर बंद (Covid 19 Problem Temple Close) असले तरी भाविकांची संख्या वाढत होती. त्यामुळे मंदिर प्रशासनाने बाहेरील भाविकांनी येऊ नये असे आवाहन या आधी केले होते. मात्र भाविकांनी ते धुडकावले.

आज मंदिर परिसरात दुकाने लागली होती. बाहेरून दर्शन घ्यावे लागत होते तरीही पंधरा ते वीस हजार भाविक आल्याने गर्दी झाली होती. उशिरापर्यंत गर्दी कायम होती. या गर्दीला सहारा कोणी दिला ? करोना बाधित वाढले तर जबाबदार कोण ? त्याच्यावर कारवाई होणार का ? अशी चर्चा परिसरात होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या